'बायोफायबर' चाचणीची आवश्यक; तापाचा नेमका प्रकार कळण्यासाठी टास्क फोर्सकडून शिफारस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 2, 2023

'बायोफायबर' चाचणीची आवश्यक; तापाचा नेमका प्रकार कळण्यासाठी टास्क फोर्सकडून शिफारस

https://ift.tt/gcMrNPy
मुंबई : करोना तसेच इन्फ्लूएन्झा स्वरूपाच्या तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही हा ताप नेमका कोणत्या प्रकारातील आहे याच्या निश्चित निदानासाठी बायोफायबर चाचणीची उपलब्धता करावी अशी मागणी टास्क फोर्सने सरकारकडे केली आहे. करोना, स्वाइन फ्लू, डेंग्यू , व्हायरल स्वरूपाच्या तापाचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या सर्वसामान्यांना कशा परवडणार, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.या चाचण्यांमधील अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आजारासाठी कारणीभूत असलेला विषाणू कोणत्या स्वरूपाचा आहे याचे निश्चित निदान करता येते. त्यामुळे आजार पहिल्या टप्प्यात असताना वैद्यकीय उपचार सुरू होऊन लक्षणांची तीव्रता अधिक वाढण्यापूर्वी तो नियंत्रणात आणता येतो. अधिक विलंब न करता चाचण्यांची संख्या वाढवणे, तपासणी, पाठपुरावा व गरज असलेल्या रुग्णांमध्ये विलगीकरण ही प्रक्रिया तप्तरेने अंमलात आणण्याची गरज टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली.करोना संसर्गाच्या लाटांच्या तुलनेत यावेळी संसर्गाच्या काही लक्षणांमध्ये फरक आहे. या आजारात फुप्फुसांच्या क्षमतेवर विषाणूचा पूर्वीइतका प्रादुर्भाव दिसत नाही. घशामध्ये तीव्र वेदना, घसादुखी, खोकला तसेच श्वसनमार्गाच्या वरच्या बाजूला लक्षणांची तीव्रता दिसून येते. त्यामुळे हा आजार नेमका कोणत्या गटातील आहे याची चाचणी करणे गरजेचे आहे. इतर संसर्गामुळेही करोनासारखी लक्षणे दिसू शकतात. शरीरात विषाणू जिवंत स्वरूपात असल्यास त्याचे निदान करण्यासाठी प्रगत चाचण्या बायोसेफ्टी पी४ स्तराच्या लॅबमध्ये होतात. कस्तुरबामध्ये पी३ तर, केईएममध्ये पी दोन स्तरातील लॅब असल्याचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये पी४ पातळीच्या लॅब असून पी३ पातळीच्या लॅबमध्ये प्रगत चाचण्या करणे शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.चाचण्यांवर दरनियंत्रणाची गरज?करोनारुग्णांची संख्या वाढत नसली तरीही संमिश्र स्वरूपाच्या तापांच्या रुग्णांमध्ये करण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये दरनियंत्रणाची गरज व्यक्त होत आहे. बायोफायबर पद्धतीची चाचणी अद्याप पालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही. खासगी संस्थेला या चाचण्या करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्या सशुल्क असल्याने त्याचे दर रुग्णांना परवडतील असे नाही. जून ते ऑगस्ट २०२२ मध्ये मुंबईमध्ये करोनारुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना पालिकेने जवळजवळ दहा हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट साध्य केले होते. जोपर्यंत चाचण्यांची संख्या वाढवणार नाही तोपर्यंत किती व्यक्तींमध्ये संसर्ग आहे हे लक्षात येणार नसल्याचे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. व्ही. आर. नायर यांनी स्पष्ट केले. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये १,३७८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. कस्तुरबासह इतर केंद्रांमध्ये माफक दरामध्ये या चाचण्या उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केली आहे. उपचाराविषयीचा निर्णय डॉक्टरांवररुग्णाला आलेला ताप हा कोणत्या प्रकारचा आहे, त्यानुसार कोणत्या चाचण्या करायच्या याचा निर्णय डॉक्टरांनी घ्यायचा आहे असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मुंबईत गेल्या ११ दिवसांमध्ये करोनाचे १,२३२ करोनाचे रुग्ण आढळले असून, त्यातील ११४ रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. यातील केवळ १४ रुग्णांना प्राणवायूची गरज भासली.