शरीर फुगलेलं अन् कुजलेलं, अंगावर जखमा, रत्नागिरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह; घातपातचा संशय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 2, 2023

शरीर फुगलेलं अन् कुजलेलं, अंगावर जखमा, रत्नागिरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह; घातपातचा संशय

https://ift.tt/Xz6vHjL
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गवर असलेल्या कामथे घाटात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते समीर काझी यांनी ही माहिती पोलिसांना दिली. शनिवारी ते येथून जात असताना त्याना दुर्गंधी आल्याने त्यांनी गाडी थांबवून पाहिले असता हा मृतदेह त्यांना दिसला. त्यांनी तात्काळ याची माहिती चिपळूण पोलिसांना दिली. त्यानंतर चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अज्ञात इसमाचे शरीर कुजलेल्या स्थितीत असून ही घटना तीन चार दिवसांपूर्वीची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृतदेहाच्या अंगावर जखमा असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. मुंबई गोवा महामार्गावर कामथे घाटात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोठ्या वळणावर ही घटना उघडकीस आली आहे. कामथे येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते समीर काझी हे सावर्डेत जात असताना त्यांना कामथे घाटात दुर्गंधीयुक्त वास आला. यावेळी त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता एका तरुणाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. हा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेहाच्या अंगात पांढरा शर्ट आणि जीन्स पॅन्ट असून व्यक्तीचा गव्हाळ रंग असं वर्णन आहे. जखमी अवस्थेत असलेला मृतदेह फुगलेल्या आणि कुजलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे ही घटना तीन चार दिवसांपूर्वीची असावी असा अंदाज आहे. या सगळ्या प्रकरणाची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या सगळ्या प्रकरणाचा तपास चिपळूण पोलीस करत आहेत.