
नवी दिल्ली : आजच्या दिवशी सोन्या आणि चांदीचा खरेदीचा विचार करत असाल तर जरा विचार करा कारण तुम्हाला कालच्या पेक्षा आज तुम्हाला खरेदीवर अधिक खिसा रिकामा करावा लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होण्याची प्रक्रिया सुरू असताना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्या आणि चांदीचा भाव खाली उतरला होता, मात्र त्यानंतर दोघांच्या किमतीत पुन्हा एकदा विक्रमी तेजी दिसून आली. याशिवाय दिवाळीच्या काळात सोने ६५,००० रुपये तर चांदीची किंमत ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असेही तज्ज्ञांचे मत आहे.सोने-चांदीच्या दरात तुफान तेजीसोन्या-चांदीच्या दरातील वाढ सलग चौथ्या दिवशीही कायम आहे. गुरुवारी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दराने नवीन पातळी गाठली. आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात MCX वर रु. १२३ प्रति १० ग्रॅम वाढ झाली असून किंमत रु. ६०,७५१ पातळीवर पोहोचली, तर कमोडिटी मार्केट उघडताच MCX वर आज चांदीची किंमत ०.३७ टक्के वाढीसह ७६,००० रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ०.१२ टक्क्यांनी वाढून २,०१७ डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव २५.४७ डॉलर प्रति औंस झाला आहे.सराफा बाजारातही तेजी कायमदरम्यन, सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. बुधवारी संध्याकाळी सोन्याचा भाव ६०,६१३ रुपये आणि चांदीचा भाव ७४,९४० रुपये किलोवर बंद झाला. तर बुधवारी संध्याकाळी इंडिया बुलियन्स असोसिएशनने (https://ibjarates.com) जाहीर केलेल्या किमतीनुसार २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०,६१३ रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदीचा भाव ७४,९४० रुपये प्रति किलो झाला. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे ९०० रुपयांची वाढ झाली तर चांदीचा भाव ७६ हजार रुपये पार गेला आहे.भारतीयांमध्ये सोन्याचं मोठं महत्त्व आहे. लग्नसोहळा असो किंवा गुंतवणुकीचे सुरक्षित माध्यम सोने खरेदी एक लोकप्रिय पर्याय आहे. त्यामुळे लोक दागिन्यांच्या रूपात सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. सोन्याकडे कायमस्वरूपी बचत म्हणून पाहिले जाते. तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की, इतर गुंतवणुकीप्रमाणे सोन्यात गुंतवणूक करताना कोणतीही कायदेशीर गुंतागुंत नसते.