Petrol Price Today: पेट्रोल आणि डीझेलच्या दराबाबत नवीन अपडेट, येथे चेक करा नवे दर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, April 21, 2023

Petrol Price Today: पेट्रोल आणि डीझेलच्या दराबाबत नवीन अपडेट, येथे चेक करा नवे दर

https://ift.tt/bUcWfXV
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत चढउतार सुरू असून गेल्या काही सत्रांपासून सातत्याने वाढत असलेली क्रूडच्या किंमतीत देखील किरकोळ बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज, २१ एप्रिल रोजी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. देशातील तेल विपणन कंपन्या दररोज वाहन इंधनचे सुधारित दर जाहीर करतात. २१ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या दरांनुसार आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे तब्बल वर्षभरापासून वाहन इंधनाचे दर 'जैसे थे' आहेत. दरम्यान, नवे आर्थिक वर्ष सुरू झाले असून नव्या आर्थिक वर्षातही सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या महागड्या किमतींपासून दिलासा मिळताना दिसत नाही.आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असले तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल गेल्या वर्षी २२ मे रोजी करण्यात आला होता. दररोज सकाळी ६ वाजता देशातील तेल विपणन कंपन्या वाहन इंधनचे नवीन दर अपडेट करतात. किंमतींमध्ये काही बदल असल्यास तो अपडेट केला जातो. येथे तुम्हाला मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नईसह विविध शहरांच्या किमती कळू शकतात.पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अशाप्रकारे समजून घ्यासर्वसामान्य वाहनचालक सहज त्याच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासू शकतो. यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटला भेट देऊन किंवा SMS पाठवावा लागेल. तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असल्यास तुम्ही RSP सह तुमचा शहर कोड ९२२४९९२२४९ वर एसएमएस पाठवू शकता तसेच जर तुम्ही BPCL ग्राहक असल्यास RSP लिहून ९२२३११२२२२ वर एसएमएस पाठवू शकता.आज महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दरदिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरमुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरकोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरचेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर