सोनीपत: हरियाणातील सोनीपतमध्ये ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलावर या हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणातील अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. चौकशीत त्याने पोलिसांना सांगितले की, त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून त्याला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे होते. यामुळे त्याने हे सगळं केलं.पाण्याच्या टाकीत ९ वर्षीय मुलाचा मृतदेहबहलगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टीडीआय एस्पिनिया सोसायटीच्या तळघरात बांधलेल्या पाण्याच्या टाकीत रक्ताच्या थारोळ्यात एका ९ वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आला होता. मुलाचे अपहरण करण्यात आले होते, त्यानंतर कुटुंबाकडे ६ लाख रुपयांची खंडणी मागितली गेली. नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. स्वत:ला अडकल्याचे पाहून अल्पवयीन आरोपीने मुलाची हत्या केली.सीसीटीव्हीत चिमुकला १५ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत फिरताना दिसलापोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि जवळपास बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग स्कॅन केले. यामध्ये हा ९ वर्षीय चिमुकला एका अल्पवयीन मुलासोबत फिरताना दिसला. पोलिसांनी संशयाच्या आधारे त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतने आणि त्याची चौकशी केली. तेव्हा संपूर्ण प्रकरण समोर आले.लवकर श्रीमंत होण्यासाठी सारा कट रचलायाप्रकरणी डीसीपी गौरव राजपुरोहित यांनी सांगितले की, अर्चित खून प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे वय १५ वर्षे आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्याला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे होते. त्यामुळेच त्याने अर्चितचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडे खंडणी मागितली होती.