
मुंबई: वाढत्या उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने रेल्वे प्रवाशांचा वातानुकूलित रेल्वे प्रवासाला पसंती मिळालेली आहे. मे महिन्याच्या अवघ्या २४ दिवसांत रोज सरासरी ५८ हजार प्रवाशांनी एसी लोकल प्रवासाला प्राधान्य दिले आहे. यंदाच्या पाच महिन्यांत मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधून ७१.३३ लाख प्रवाशांनी केला आहे. गेल्यावर्षी मे महिन्याच्या तुलनेत यंदा मे महिन्याच्या एसी लोकल प्रवासी संख्येत २२८ टक्यांनी वाढ झालेली आहे. एसी लोकलला प्रतिसाद उदंड असला तरी मर्यादित फेऱ्यांमुळे मोठा प्रवासीवर्ग एसी लोकलच्या प्रवासापासून दुरावला आहे.१ जानेवारी ते २४ मे २०२३एसी लोकल प्रवासी संख्या - ७१.३३ लाखएसी लोकल उत्पन्न - ३२.२२ कोटीप्रवासी वाढले- १ मे ते २४ मे २०२२एसी लोकल प्रवासी संख्या - ६.१७ लाख- १ मे ते २४ मे २०२३एसी लोकल प्रवासी संख्या - १४.१३ लाख- प्रवासी वाढ - २२८ टक्केउत्पन्न वाढले- १ मे ते २४ मे २०२२एसी लोकल प्रवासी उत्पन्न - २.८३ कोटी- १ मे ते २४ मे २०२३एसी लोकल प्रवासी उत्पन्न - ६.६६ कोटी- उत्पन्न वाढ - २३४ टक्केमहिना - प्रवासी संख्या (लाखांमध्ये ) - उत्पन्नजानेवारी - १३.४९ - ५.८१फेब्रुवारी - १३.५० - ५.९४मार्च - १५.१८ - ६.७३एप्रिल - १५.०४ - ७.०८२४ मेपर्यंत - १४.१३ - ६.६६* मे महिना (अंदाजित ) - १६ - ७.५० (अंदाजित)महिना - रोजचे सरसरी प्रवासीजानेवारी - ४३,५३०फेब्रुवारी - ४८,२२५मार्च - ४८,९८९एप्रिल - ५०,१०३२४ मे पर्यंत - ५८,८८०*संपूर्ण मे महिना - ६०,००० (अंदाजित)मध्य रेल्वेवरील एसी लोकल- मुंबई विभागात ४ वातानुकूलित रेल्वे गाड्या आहेत.- रोज ५६ एसी फेऱ्या धावतात.- रविवार आणि सुट्टीच्या दिवशी १४ लोकल फेऱ्या धावतात.- एसी लोकलची देखभाल दुरुस्ती कुर्ला कारशेड येथे होते.- दरवाजे बंद असल्याने धावत्या लोकलमधून पडून होणारे अपघातावर पूर्णपणे नियंत्रण- सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा, प्रवासी माहिती यंत्रणा यांचा समावेश यात आहे.