Mumbai Rain Update: यंदाच्या पावसातील हे १७ दिवस महत्वाचे; उधाण-भरतीच्या वेळा आणि तारखा जाहीर... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 21, 2023

Mumbai Rain Update: यंदाच्या पावसातील हे १७ दिवस महत्वाचे; उधाण-भरतीच्या वेळा आणि तारखा जाहीर...

https://ift.tt/Kjai5rN
म.टा.वृत्तसंस्था, मुंबई : समुद्राच्या उधाण-भरतीच्या वेळी अतिवृष्टी झाली तर मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबून जनजीवन ठप्प होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग भरतीच्या परिस्थितीचे निरीक्षण आणि उपाययोजना करीत असतो. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राच्या उधाण-भरतीचे १७ दिवस आणि वेळा पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी जाहीर केल्या आहेत. यावेळी समुद्राला साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येते. त्यात अतिवृष्टी झाली तर पाण्याचा निचरा न होता ते तुंबून राहते. त्यामुळे यावेळी काळजी घ्यावी, असे आवाहन सोमण यांनी केले आहे.हे दिवस महत्त्वाचे...४ जून, रविवार दुपारी १२-१६५ जून, सोमवार दुपारी १-०१६ जून, मंगळवार दुपारी १-४७७ जून, बुधवार दुपारी २-३५८ जून, गुरुवार दुपारी ३-२५३ जुलै, सोमवार दुपारी १२-०२४ जुलै, मंगळवार दुपारी १२-४९५ जुलै, बुधवार दुपारी १-३६६ जुलै, गुरुवार दुपारी २-२३७ जुलै, शुक्रवार दुपारी ३-१०८ जुलै, शनिवार दुपारी ३-५५१ ॲागस्ट, मंगळवार सकाळी ११-४६२ ऑगस्ट, बुधवार दुपारी २२-३०३ ऑगस्ट, गुरुवार दुपारी १-१४४ ऑगस्ट, शुक्रवार दुपारी १-५६५ ऑगस्ट, शनिवार दुपारी २-३८६ ऑगस्ट, रविवार दुपारी ३-२० विदर्भाबाबत हवामान खात्याचा अंदाज; तापमान राहू शकते ४३ अंशांच्या आसपासविदर्भ व मध्य भारतात उन्हाळ्यात नवतपाला विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसांत तापमान सर्वाधिक असते, अशी धारणा आहे. मात्र, यंदा २२ मेपासून सुरू होत असलेल्या नवतपादरम्यान विदर्भ व नागपुरातील तापमानात फारशी वाढ होणार नसल्याचे संकेत आहेत. प्रादेशिक हवामान खात्यानुसार, या काळात तापमान ४२ ते ४३ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यात सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो. यावेळी सूर्य १५ दिवसांसाठी रोहिणी नक्षत्रात असतो. यातील सुरुवातीचे नऊ दिवस सर्वाधिक तापमानाचे असतात, अशी धारणा आहे. त्यामुळे या नऊ दिवसांना नवतपा म्हणून संबोधले जाते. या काळात सूर्याची किरणे पृथ्वीवर सरळ रेषेत येतात. यामुळे तापमान व उकाड्यात वाढ होते. या तापमानामुळे समुद्रातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते व यामुळे मान्सून चांगला होतो, असा समज आहे. त्यामुळे नवतपा सुरू असताना पाऊस पडू नये व तापमान वाढावे, असे सांगितले जाते. याच काळात वाढलेल्या तापमानामुळे मनुष्यासाठी धोकादायक असलेले जीव-जंतूसुद्धा मरण पावतात, अशीही मान्यता आहे. मात्र, यंदा नवतपादरम्यान फारसे तापमान वाढण्याची शक्यता नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यंदाच्या मोसमातील उच्चांक ४४.३ अंश सेल्सिअस आहे. २२ मेपासून सुरू होणाऱ्या नवतपादरम्यान तापमान ४२ ते ४३ अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नवतपादरम्यान यंदाच्या मोसमातील उच्चांक नोंदविला जाण्याची शक्यता कमी आहे.