Rinku Singh च्या वादळाचा लखनऊनं घेतलेला धसका, ११० मीटरचा सिक्स अन् पराभवाची भीती, मैदानावरील गोष्ट समोर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 21, 2023

Rinku Singh च्या वादळाचा लखनऊनं घेतलेला धसका, ११० मीटरचा सिक्स अन् पराभवाची भीती, मैदानावरील गोष्ट समोर

https://ift.tt/bwS9CBV
कोलकाता: आयपीएल २०२३ मधून भारतीय संघाला काय मिळू शकतं असं विचारलं तर रिंकू सिंह याचं नाव सांगितलं जाईल. रिंकू सिंहनं लखनऊविरुद्ध खेळताना वादळी खेळी केली. कोलकाता नाईट राईडर्स आणि लखनऊ सुपरजायंट्स लढतीत रिंकूनं टीमला विजयाच्या उंबरठ्यावर उभं केलं होतं. मात्र, दुसऱ्या बाजूनं कुठल्याही फलंदाजाची साथ न मिळाल्यानं संघाला १ रननं पराभव स्वीकारावा लागला अन् त्यांच्या टीमचा प्रवास संपला. रिंकू सिंहनं ३३ बॉलमध्ये ६ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ६७ धावा केल्या. केकेआरला अखेरच्या दोन ओव्हरमध्ये ४१ धावा हव्या होत्या. रिंकूनं आक्रमक होत जोरदार फटकेबाजी केली पण त्याला यश आलं नाही. मात्र, रिंकूची खेळी पाहून टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूंनी रिंकूला लवकर टीम इंडियात संधी द्या असं म्हटलं आहे. लखनऊ सुपरजायंट्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना ८ विकेट वर १७६ धावा केल्या होत्या. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना केकेआरनं ७ विकेट वर १७५ धावा केल्या. लखनऊच्या टीमनं १४ मॅचमध्ये आठवा विजय मिळवला त्यांच्याकडे १७ गुण झाल्यानं त्यांनी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. चेन्नई सुपरकिंग्सचं नेट रनरेट चांगलं असल्यानं ते दुसऱ्या स्थानी आहेत. आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चैलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरस आहे. लखनऊचा कप्तान कृणाल पंड्यानं चार ओव्हरमध्ये ३० धावा दिल्या. रिंकू सिंहच्या खेळीबद्दल जेव्हा त्याला विचारण्यात आलं तेव्हा त्यानं या हंगामात रिंकूची कामगिरी विशेष राहिली आहे. तुम्ही त्याला हलक्यात घेऊ शकत नाही. तो खास फलंदाज आहे. अखेरच्या ओव्हरमध्ये एका एका बॉलवर विचार करावा लागत होता, असं कृणाल पांड्या म्हणाला. या मॅचमध्ये दोन विकेट घेणाऱ्या रवी बिश्नोईनं सांगितलं रिंकूला बॉल टाकताना प्रत्येक बॉल टाकण्यापूर्वी टेन्शन येत होतं. अशी खतरनाक फलंदाजी कधी पाहिली नव्हती, हे सगळ अविश्वसनीय होतं, असं तो म्हणाला. रिंकूनं ११० मीटर लांब अंतराचा सिक्स लगावल्यानंतर पराभवाचं टेन्शन वाढलेलं, असंही लखनऊच्या खेळाडूंनी सांगितलं. केकेआरकडून रिंकूशिवाय जेसन रॉयनं चांगली खेळी केली. जेसन रॉयनं २८ बॉलमध्ये सात चौकार आणि एका षटकारासह ४५ धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी वेंकटेश अय्यरच्या साथीनं ६१ धावांची भागिदारी केली होती. मात्र, कोलकाताचा संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरला.