पतपरधन करयलयच सरवत महततवच फन मरम वसरतत तवह... रषटरपतवरल पसतकत दव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 26, 2023

पतपरधन करयलयच सरवत महततवच फन मरम वसरतत तवह... रषटरपतवरल पसतकत दव

https://ift.tt/WTDPXcs
नवी दिल्ली : मोबाइलच्या वापराची फारशी सवय नसल्याने एखादा महत्त्वाचा निरोप ‘मिस’ होऊ शकतो, तोही थेट पंतप्रधान कार्यालयाचा, असे सांगितले तर आश्चर्य वाटेल. मात्र, हा प्रकार घडला तो राष्ट्रपती यांच्याबाबतीत. एका पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे.राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे (एनडीए) मुर्मू त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले जाणार होते, ते सांगण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्याशी संपर्क केला. पंतप्रधान कार्यालयाने, २१ जून २०२२रोजी मुर्मू यांनी कॉल केला होता. तो त्यांनी न घेतल्याने झारखंडमधील त्यांचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी विकासचंद्र मोहंतो यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मोहंतो यांनी मुर्मू यांच्या निवासस्थानी मोबाइलसह धाव घेतली आणि त्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन असल्याचा निरोप दिला. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी संपर्क साधला. दुसरीकडे, मुर्मू यांच्या नावाची राष्ट्रपतीपदासाठी चर्चा सुरू असल्याच्या बातम्या विविध वाहिन्यांवर दाखविण्यात येत होत्या. मात्र, दुर्दैवाने वीजपुरवठा खंडित झाल्याने मुर्मू आणि त्यांचे कुटुंबीय या बातम्या पाहू शकले नाहीत, असेही पुस्तकात म्हटले आहे. रुपा प्रकाशनाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या पत्रकार कस्तुरी रे यांच्या ‘द्रौपदी मुर्मू : फ्रॉम ट्राइबल हिंटरलँड टू रायसीना हिल’ या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. पुस्तकाद्वारे रे यांनी मुर्मू यांचा शिक्षक ते सामाजिक कार्यकर्त्या, नगरसेवक ते मंत्री आणि झारखंडचे राज्यपाल ते भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रवास रेखाटला आहे. दरम्यान, द्रोपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला येत्या काही दिवसांमध्ये एक वर्ष पूर्ण होणार आहे. द्रोपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती होण्यापूर्वी भाजपमध्ये काम केलं होतं. त्यांनी मंत्री ते राज्यपाल म्हणून काम केलं होतं. राजकारणात येण्यापूर्वी त्या अध्यापनाचं देखील काम करायच्या. द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय झाला होता. त्यांच्या विरोधात यशवंत सिन्हा यांनी निवडणूक लढवली होती. येत्या काही दिवसांमध्ये मुर्मू यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे.