Weather Alert: रजयत मनसनच वरद पढल तन दवस महततवच य जलहयल यल अलरट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 26, 2023

Weather Alert: रजयत मनसनच वरद पढल तन दवस महततवच य जलहयल यल अलरट

https://ift.tt/NsiY9ak
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये सरासरी १०.८ मिमी पावसाची नोंद झाली. प्रत्येक तालुक्यात मान्सूनचे आगमन झाले असून, सोमवारी घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याशिवाय मंगळवारपासून पुढील तीन दिवस यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाल्याची सुखद वार्ता हवामान विभागाने दिली आहे. शनिवारी दिवसभरात प्रत्येक तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. येवला तालुक्यात सर्वाधिक ३१.४ मिमी पावसाची नोंद झाली. मालेगावात २५.६, तर देवळा तालुक्यात २३.८ मिमी पाऊस झाला. चांदवड तालुक्यातदेखील १७.१ मिमी पावसाची नोंद झाल्याने शेतकरी सुखावला आहे. निफाडमध्ये १४.८ मिमी पाऊस झाला असून, सर्वात कमी ०.३ मिमी पाऊस दिंडोरी तालुक्यात नोंदविला गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.तालुकानिहाय झालेला पाऊस (मिमी)तालुका पाऊसयेवला ३१.४मालेगाव २५.६देवळा २३.८चांदवड १७.१निफाड १४.८त्र्यंबकेश्वर १०.८सिन्नर ९.३इगतपुरीत ९.१नांदगाव ५.८नाशिक ४.०कळवण २.२बागलाण ०.९पेठ ०.८सुरगाणा ०.४दिंडोरी ०.३सरासरी १०.८इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ हे तालुके डोंगराळ भागात असून, सोमवारी तेथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याशिवाय उद्या (दि. २७) पासून यलो अलर्ट दिला असून, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी दिवसभर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण होते. परंतु, सायंकाळपर्यंत ग्रामीण भागात कोठेही फारसा पाऊस झाला नाही.या मंडळांत सरासरीहून अधिक पाऊसजिल्ह्यात तीन मंडळांत सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी दोन मंडळे मालेगाव तालुक्यातील आहेत. निमगाव आणि सौंदाणे येथे १ ते ३० जून या कालावधीत ८८.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात निमगावला १११.७ मिमी म्हणजेच १२६.४ टक्के, तर सौंदाणे येथे ९६.४ मिमी म्हणजेच सरासरीच्या १०९ टक्के पाऊस झाला आहे. याशिवाय देवळा तालुक्यातील उमराणे येथेदेखील १०७.२ टक्के पावसाची नोंद झाली. येथे ८६.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात आतापर्यंत ९२.६ मिमी पाऊस झाला.मंडळ पाऊस (टक्के)सौंदाणे १०९निमगाव १२६.४उमराणे १०७.२