देशभर मान्सूनचा धुमाकूळ, अनेक राज्यात पुराचा तडाखा; देशाचे १५ हजार कोटी पाण्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 20, 2023

देशभर मान्सूनचा धुमाकूळ, अनेक राज्यात पुराचा तडाखा; देशाचे १५ हजार कोटी पाण्यात

https://ift.tt/zKIi68g
नवी दिल्ली : यंदाच्या पावसाने भारतातील अनेक भागांमध्ये हाहाकार माजवला आहे. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक राज्ये गेल्या काही आठवड्यांपासून पुराच्या तडाख्यात आहेत. पुरामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार पुरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला १० ते १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.याआधी वादळाचा कहरदेशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या इकोरॅप (Ecowrap) अहवालात आकडेवारी देण्यात आली असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, पुरामुळे देशाचे १० हजार ते १५ हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नैसर्गिक कारणांमुळे होणारी जीवित व वित्तहानी ही चिंतेची बाब असल्याचे अहवालात म्हटले आहे. पुरापूर्वी बिपरजॉय वादळानेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले होते.नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढलीएसबीआयच्या अहवालानुसार, अमेरिका आणि चीननंतर भारताला नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसत आहे. १९९० नंतर भारताला अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. १९०० ते २००० या १०० वर्षांमध्ये भारतात नैसर्गिक आपत्तींची संख्या ४०२ होती तर २००१ ते २०२२ या २१ वर्षांत त्यांची संख्या ३६१ होती.पुरामुळे सर्वाधिक नुकसानएसबीआयने नैसर्गिक आपत्तींमध्ये पूर व्यतिरिक्त दुष्काळ, भूस्खलन, वादळ आणि भूकंप यांचा समावेश केला आहे. अहवालानुसार, सर्वात जास्त विध्वंस पुरामुळे होतो. एकूण नैसर्गिक आपत्तींपैकी ४१ टक्के एकट्या पुराचा वाटा आहे. पुरानंतर वादळाने मोठे नुकसाने केले आहे. भारतातील नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानामागे विम्याचा अभाव हे एक प्रमुख कारण असल्याचे एसबीआयचे मत आहे.हिमाचलला सर्वाधिक फटकाउत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली या डोंगराळ राज्यांना यंदाच्या पावसात अधिक नुकसान सहन करावे लागत आहे. यापूर्वी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दावा केला होता की, गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पावसामुळे त्यांच्या राज्याचे सुमारे ८ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.