अजत आगरकरन कस कल फतमश लगन जणन घय पयरवल लवहसटर... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 5, 2023

अजत आगरकरन कस कल फतमश लगन जणन घय पयरवल लवहसटर...

https://ift.tt/e61GDt5
मुंबई : सध्याच्या घडीला अजित आगरकर हा सर्वात जास्त चर्चेत आहे. पण त्याचवेळी अजित आगरकरची प्यारवाली लव्हस्टोरीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कारण अजितचं लग्न त्यावेळी कोणालाच मान्य नव्हतं. पण त्यानंतर त्याेन फातिमाशी लग्न कसं केलं, हे आता समोर आले आहे.अजित हा एका मराठमोळ्या घरातला मुलगा. मुंबईत त्याची कारकिर्द सुरु झाली. मुंबईच्या संघात दमदार कामगिरी करून तो भारतीय संघात दाखल झाला. भारतीय संघात दाखल झाल्यावर त्याने दमदार कामगिरी केली आणि आपले संघातील काम त्याने कायम राखले. भारतीय संघातील तो एक महत्वाचा खेळाडू ठरला होता आणि त्यामुळे त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. पण हे सर्व सुरु असतानाच अजित एका सुंदरीच्या प्रेमात पडला होता. एकिकडे क्रिकेटची कारकिर्द बहरत असताना त्याची लव्हस्टोरीही फुलत होती. अजितच्या गर्लफ्रेंडचे नाव होते ते फातिमा. फातिमा हे नाव ऐकल्यावर हे लग्न काही सहजपणे झालं नसेल, हे तुम्हाला समजलं असेलच. फातिमा ही अजितच्या एका मित्राबरोबर त्याचे सामने पाहायला यायची, त्यावेळी त्याची आणि तिची भेट झाली. त्यानंतर दोघांची मेत्री झाली, दोघे एकमेकांना भेटत राहीले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर अजित आणि फातिमा हे एकमेंकाना डेट करत होते. या लग्नासाठी त्यांच्या घरातून विरोध होता. पण या दोघांनी मात्र आपला निर्णय कायम ठेवला. घरून विरोध असला तरी अजित आणि फातिमा यांनी लग्न करायचे ठरवले. या दोघांची पहिली मुलाखत १९९९ साली झाली होती. त्यानंतर या दोघांनी ९ फेब्रुवारी २००२ साली लग्न केले. या दोघांना आता राज नावाचा मुलगाही आहे. अजित आणि फातिमा यांचे सोशल मीडियावर बरेच फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सध्याच्या घडीला अजितचे नाव हे बीसीसीआयच्या निवड समिती अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. यापूर्वी अजित हा दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक होता. पण आता त्याने हे पद सोडले आहे.