तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले, विजयभाऊंची काय गॅरंटी? बच्चू कडूंचा वडेट्टीवारांना टोला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 6, 2023

तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले, विजयभाऊंची काय गॅरंटी? बच्चू कडूंचा वडेट्टीवारांना टोला

https://ift.tt/nUpIM6K
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘काँग्रेसचे नेते व विजय वडेट्टीवार हे आपल्या भविष्यातील राजकारणावर नेहमीच भाष्य करतात. मात्र, भविष्यात काय राजकारण होईल कोणाला माहिती आहे? याअगोदर तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले, आता विजयभाऊ यांची काय गॅरंटी आहे’ असा टोला प्रहार संघटनेचे नेते यांनी मंगळवारी लगावला.नाशिकमध्ये दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.‘गेल्या पन्नास वर्षांत झाली नाहीत, इतकी पक्षांतरे पाच वर्षांत झाली आहेत. त्यावर पीएचडीच होऊ शकेल’ असेही ते म्हणाले. ‘पंकजा मुंडे यांची स्वत:ची क्षमता आहे. त्यांचे स्वतःचे दहा पंधरा आमदार असतील, तर मग आम्हीही युती करू,’ असे सूतोवाचही त्यांनी केले.जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणी त्यांनी सरकारची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. ‘राज्यकर्ते अशा प्रकारे लाठीमार करा, असे आदेश कधीच देत नसतात. मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार असते, तरी त्यांनी असे कधीही आदेश दिले नसते. स्थानिक स्तरावरील अधिकारी परिस्थिती हाताळताना अपयशी ठरल्याने चुका होतात,’ असे सांगत त्यांनी सारवासारव केली.