बैलपोळ्याच्या दिवशीच राजाने मालकाची साथ सोडली; नंतर शेतकऱ्याच्या कृतीनं सर्वांच्याच डोळ्यात अश्रू दाटले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 15, 2023

बैलपोळ्याच्या दिवशीच राजाने मालकाची साथ सोडली; नंतर शेतकऱ्याच्या कृतीनं सर्वांच्याच डोळ्यात अश्रू दाटले

https://ift.tt/0KyIUg9
नांदेड: शेतात आपल्यासोबत राबणाऱ्या बैलांवर जीवापाड प्रेम करून त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ करणारे अनेक शेतकरी आहेत. त्यांचा सांभाळ करून अंत्यसंस्कार करणाऱ्या घटना देखील आपण पाहत असतो. अशीच काहीशी घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडजवाडी येथील इरना कास्टेवाड या शेतकऱ्याने आपल्या राजा नावाच्या बैलाची गावातून अंत्ययात्रा काढून त्याचे अंत्यसंस्कार केले. पोळा सणाच्या पूर्व संध्येला बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. इरना कास्टेवाड यांनी १८ वर्षा पूर्वी सर्जा आणि राजा असे दोन बैल विकत घेतले होते. दोन्ही बैलांची कुटुंबियांनी लाड करत सांभाळ केला. काही वर्षा पूर्वी इरना यांनी एक बैल विकला तर राजा नावाचा बैल त्यांच्याजवळ होता. अत्यंत राजबिंडा, चकाकी आणि चपळाई असलेला राजा क्षणार्धात कोणाचेही लक्ष वेधून घ्यायचा. मात्र वयोमानामुळे राजा या बैलाने पोळा सणाच्या पूर्संध्येला मालकाची कायमची साथ सोडली. माणुसकी जोपासत आणि प्रेमापोटी मालकाने देखील राजा या बैलाची गावातून बँड बाजा लावून अंत्ययात्रा काढली. अंत्यविधी करुन राजाचा निरोप घेतला. या अंत्ययात्रेत गावकरी देखील सहभागी झाले होते. यावेळी सर्वांना अश्रू अनावर झाले होते. लाडका राजा बैल घेण्यापूर्वी मी आणि माझी पत्नी खडी मशीन येथे कामाला मजुरीने जात होतो. आम्ही राजा बैल घेतल्यानंतर आम्ही त्याचा जीवापाड सांभाळ केला. या राजा बैलाच्या मेहनतीमुळे माझे दोन मुले पुणे आणि अमरावती येथे शासकीय नोकरीला आहेत. त्यामुळे या राजा बैलानी खूप असे काही आमच्या जीवनात बदल घडवले आहेत. त्यामुळे आम्हाला अश्रू अनावर होत आहेत, अशी भावना देखील इरना कास्टेवाड या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.