हार्बर मार्गावर पुढील २२ दिवस ब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द, जाणून घ्या नवं वेळापत्रक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 11, 2023

हार्बर मार्गावर पुढील २२ दिवस ब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द, जाणून घ्या नवं वेळापत्रक

https://ift.tt/j0RGDMT
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मध्य रेल्वेने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या कामासाठी आज, सोमवारपासून २ ऑक्टोबरपर्यंत रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. पनवेल यार्डमध्ये रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाचपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील रात्री उशिरा धावणाऱ्या आणि पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) ते ग्रेटर नोएडातील दादरीपर्यंत समर्पित मार्गिका उभारण्यात येणार आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून पनवेल स्टेशन यार्डमध्ये दोन मार्गिका उभारण्यात येणार आहेत. यासाठी लोकल पार्किंग मार्गिकांमध्ये बदल करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.स्थानक : पनवेल यार्ड वेळ : रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाचपर्यंत, कालावधी : ११ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरशेवटची लोकल रात्री १०.५८ : सीएसएमटी-पनवेल रात्री ११.३२ : ठाणे-पनवेलरात्री १०.१५ : पनवेल-ठाणेपहिली लोकलसकाळी ४.३२ : सीएसएमटी-पनवेलसकाळी ५.४० : पनवेल-सीएसएमटीसकाळी ६.२० : ठाणे-पनवेलसकाळी ६.१३ : पनवेल-ठाणेरद्द लोकल फेऱ्या सीएसएमटी-पनवेल : रात्री ११.१४, १२.२४, पहाटे ५.१८, सकाळी ६.४०पनवेल-सीएसएमटी : रात्री ९.५२, १०.५८, पहाटे ४.०३, ५.३१ठाणे-पनवेल-नेरुळ : रात्री ९.३६, १२.०५, पहाटे ५.१२, ५.४०पनवेल-ठाणे : रात्री ११.१८, पहाटे ४.३३, ४.५३अंशत: रद्दरात्री : ११.३०, ११.५२, १२,१३,१२.४० सीएसएमटी-पनवेल लोकल बेलापूरपर्यंत धावतील आणि तेथूनच सीएसएमटीकडे रवाना होतील.रात्री : १२.५० वडाळा-बेलापूर लोकल वाशीपर्यंत धावणार आहे.