मराठा आंदोलक आक्रमक, काळ्या फिती लावून अशोक चव्हाण यांनाच घेराव घातला, पुढे काय घडलं? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 10, 2023

मराठा आंदोलक आक्रमक, काळ्या फिती लावून अशोक चव्हाण यांनाच घेराव घातला, पुढे काय घडलं?

https://ift.tt/cYLbdwE
नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून ठिकठिकाणी उपोषणे-आंदोलन केले जात आहे. त्यातच आता लोकप्रतिनिधींना देखील मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे. शनिवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपसमितीचे माजी अध्यक्ष यांना देखील मराठा समाजाच्या या रोषाचा सामना करावा लागला. मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं? असा जाब विचारत आंदोलनकर्त्यांनी घातला. जिल्हातील धर्माबाद शहरात हा प्रकार घडला.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हातील धर्माबाद तालुक्यात सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरु आहे. मागील पाच दिवसापासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण केले जातं आहे. त्यातच शनिवारी काँग्रेसच्या वतीने माहेश्वरी भवन येथे पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे नेते तथा मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हजेरी लावली होती. यावेळी आंदोलनकर्ते डोक्याला काळ्या फिती लावून बैठक स्थळी पोहचले. बैठक संपल्यानंतर अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे इतर नेते कार्यक्रमस्थळाच्या बाहेर पडले, तेव्हा संतप्त आंदोलनकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना घेराव घातला. मराठा समाजाचं सर्वत्र आंदोलन सुरु असताना राजकीय कार्यक्रम का आयोजित केला? बैठक का घेतली? मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असताना तुम्ही काय केले? समाजाचा प्रश्न निकाली का काढला नाही? असे अनेक प्रश्न विचारले. यावेळी आंदोलनकर्त्यानी प्रचंड घोषणाबाजी देखील केली. जमावाचा रोष पाहून अशोक चव्हाण हे पोलीस बंदोबस्तात तेथून निघून गेले. या प्रकारानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविला नसल्याने मराठा आंदोलक राजकीय नेत्यांना जाब विचारताना दिसून येत आहेत.मराठा आरक्षणाचे फुलंब्रीत पडसाद, तरुणाने अंगावर डिझेल ओतून घेतलंछत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पाल फाटा येथे सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनदरम्यान पाथ्री येथील माजी सरपंच वरुण पाथ्रीकर या तरुणाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ठिकाणी असलेले मराठा समाज बांधव व पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी मध्यस्थी करून पाथ्रीकर यांच्या अंगावर पाणी ओतले आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं.