Mumbai News: कल्याण-ठाणे मेट्रोला ९ महिन्यांचा विलंब, नागरिकांची उत्सुकता शिगेला; कारण काय? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 1, 2023

Mumbai News: कल्याण-ठाणे मेट्रोला ९ महिन्यांचा विलंब, नागरिकांची उत्सुकता शिगेला; कारण काय?

https://ift.tt/uzVIkb3
मुंबई : कल्याण-ठाणे या मेट्रो-५ला नऊ महिन्यांचा विलंब होण्याची चिन्हे आहेत. या मार्गिकेसाठीच्या कारशेडमध्ये वने व खारफुटीचा अडथळा आला आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वन परवानगीसाठी सल्लागार नेमण्याची तयारी सुरू केली आहे.मेट्रो-५ ही कल्याण व ठाण्याला जोडणारी २९.४ किमीची उन्नत मार्गिका आहे. त्यावर एकूण १५ स्थानके आहेत. या मार्गिकेचा पहिला टप्पा धामणकर चौक (भिवंडी) ते कापूरबावडी (ठाणे) असा असेल. तेथे ही मार्गिका ठाणे ते वडाळा या मेट्रो ४ला जोडली जाणार आहे. या पहिल्या टप्प्यात बाळकुम नाका; कशेळी; काल्हेर; पूर्णा; अंजूरफाटा आणि धामणकर नाका, अशा सहा उन्नत स्थानकांचा समावेश आहे. या मार्गिकेवरील गाड्यांच्या दुरुस्तीचे कारशेड ठाणे-भिवंडी मार्गावरील कशेळी येथे प्रस्तावित आहे. मात्र त्यासाठीच्या जमिनीसंबंधी वने व खारफूटीचा अडथळा आला आहे. हा अडथळा दूर करण्यासंबंधी एमएमआरडीएने सल्लागार नियुक्तीची निविदा काढली आहे. त्यानुसार, संबंधित कंत्राटदाराने वन विभागासंबंधी नऊ प्रकारच्या परवानग्या मिळविणे व उच्च न्यायालयाकडून खारफुटी तोडण्यासंबंधी परवानगी घेणे आवश्यक आहे. याखेरीज विविध प्रकारचे सर्वेक्षण करणे; अभ्यास; जीपीएस आधारित पाहणी करणे; कारशेड परिसरातील झाडांची आकडेवारी गोळा करणे, आदी कामे करायची आहेत. हा सर्व अभ्यास एकूण सात टप्प्यांत करायचा असून एमएमआरडीएकडे नऊ महिन्यांत (२७० दिवस) त्याचा विस्तृत अहवाल सोपवायचा आहे. त्यानंतरच एमएमआरडीए या कारशेड उभारणीसाठी निविदा काढू शकणार आहे.दुरुस्ती डेपो, कारशेड अत्यावश्यककोणत्याही मेट्रो मार्गिकेत दुरुस्ती डेपो किंवा कारशेड अत्यावश्यक असते. हा डेपो उभा झाल्याखेरीज मेट्रो मार्गिका सुरू करणे अशक्य असते. त्यामुळेच आता कल्याण-ठाणे या मेट्रो ५ मार्गिकाला नऊ महिन्यांचा विलंब होण्याची चिन्हे आहेत.