दोन वर्षांची पोरगी बेपत्ता, मग तिचा मृतदेह घरातच सोफ्याखाली सापडला, भयंकर घटनेचा उलगडा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 19, 2023

दोन वर्षांची पोरगी बेपत्ता, मग तिचा मृतदेह घरातच सोफ्याखाली सापडला, भयंकर घटनेचा उलगडा

https://ift.tt/4qmiXFa
जबलपूर: एका महिलेने आपल्याच भाचीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात घडली आहे. मुलगी सतत रडत होती आणि काकूला झोपू देत नव्हती. त्यानंतर काकूने भाचीची हत्या केल्याचा आरोप आहे. तिने गळा आवळून भाचीची हत्या केली आहे. त्यानंतर तिने भाचीचा मृतदेह सोफ्याखाली लपवला. या घटनेची माहिती मंगळवारी पोलिसांना मिळाली. हे संपूर्ण प्रकरण हनुमानताल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजीव नगर येथील आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.पोलिस स्टेशन प्रभारी एम. द्विवेदी यांनी सांगितले की, मोहम्मद शकील यांची मुलगी दुपारी बेपत्ता झाली. त्यांनी सांगितले की, कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेतला आणि ती सापडली नाही. तेव्हा त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. द्विवेदी म्हणाले की, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केल्यानंतर बेपत्ता मुलीबाबत कोणताही सुगावा लागला नाही. नंतर पोलिसांनी शकीलच्या घरात मुलीचा शोध सुरू केला. तेव्हा तिचा मृतदेह सोफ्याखाली सापडला. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शकील त्याच्या भावांसोबत एकाच घरात राहतो. सोमवारी दुपारी मुलगी तिच्या काकूच्या खोलीत गेली. दोघांनी एकत्र जेवण केले आणि नंतर मुलीच्या काकूने तिला झोपायचे असल्याने आईकडे जाण्यास सांगितले. मुलीने जाण्यास नकार दिल्यावर आरोपी काकूने तिला चापट मारली. त्यानंतर मुलगी सतत रडू लागली, त्यामुळे तिची काकू अधिकच चिडली. तिने तिचा गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप आहे. मृतदेह सोफ्याखाली लपविला होता. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या काकूचं नाव अफसाना असून तिने हत्येची कबुली दिली आहे. तिला शांत करण्यासाठी तिचं नाक-तोंड दाबलं. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिने भाचीचा मृतदेह सोफ्याखाली लपवला आणि सगळ्यांना सांगितलं की ती जेवल्यावर निघून गेली.