पत्नी मुलांसह बेपत्ता; पती कौटुंबिक तणावात, अखेर टोकाचा निर्णय घेतला, परिसरात हळहळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 24, 2023

पत्नी मुलांसह बेपत्ता; पती कौटुंबिक तणावात, अखेर टोकाचा निर्णय घेतला, परिसरात हळहळ

https://ift.tt/crYtJj8
जळगाव: शहरातील मेहरूण भागात रेणूका नगर परिसरातील ४२ वर्षीय इसमाने कौटुंबिक विवंचनेतून छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. संतोष वामन भावसार (वय ४२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संतोष हे कौटुंबिक तणावात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. सोमवारी ते सकाळपासून घराच्या बाहेर पडलेच नाही. याबाबत नागरिकांना संशय आला. त्यांनी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास संतोष भावसार यांच्या घरात जाऊन पाहिले असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबतची माहिती त्यांच्या बहिणींना देण्यात आली. त्यावेळी त्यांनी आक्रोश केला. संतोष भावसार रेणुका नगरात एकटे राहत होते. त्यांची पत्नी तीन महिन्यांपासून तीन मुलांसहित बेपत्ता आहे. प्लम्बिंग काम करून ते स्वतःचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या विवाहित बहिणी रेणुकानगर परिसरातच राहतात. दरम्यान घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.