कष्टकऱ्यांच्या वसाहतींना फिरत्या नेत्र रुग्णालयाचा आधार, नायर रुग्णालयाचा अभिनव उपक्रम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 3, 2023

कष्टकऱ्यांच्या वसाहतींना फिरत्या नेत्र रुग्णालयाचा आधार, नायर रुग्णालयाचा अभिनव उपक्रम

https://ift.tt/TlBSGXL
म. टा. विशेष प्रतिनिधी : शारीरिक दुखण्याप्रमाणे डोळ्यांच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. मात्र डोळ्यांच्या तक्रारींवर योग्यवेळी उपचार घेतले जात नाहीत. डोळे दुखायला लागले, नजर कमी झाली किंवा गंभीर स्वरूपाचे नेत्रदोष निर्माण झाल्यानंतरच उपचार घेतले जातात. त्यामुळे ज्या रुग्णांना वेळेवर रुग्णालयांपर्यंत पोहचणे अडचणीचे असते, त्यांच्यासाठी नायर रुग्णालयाने फिरते नेत्ररुग्णालय सुरू केले आहे. हा विशेष उपक्रम अविरतपणे सुरू असून रुग्णसेवेसाठी त्याची मदत होत असल्याचे दिसून येत आहे.कधी कामानिमित्त तर कधी रोजगार बुडेल, या चिंतेमुळे मुंबईच्या अनेक भागांमधील कष्टकरी तसेच मध्यमवर्गीय रुग्ण नियमित डोळ्यांची तपासणी करणे टाळतात. त्यामुळे डोळ्यांच्या किरकोळ तक्रारींचे पर्यावसन गंभीर स्वरूपाच्या आजारांमध्ये होते, हे लक्षात घेऊन १९७५मध्ये एका छोट्या जीपमध्ये हा फिरते नेत्ररुग्णालय सुरू करण्यात आले आहे. चित्ता कॅम्प, शिवाजीनगर, मालवणी या भागांतून ही नेत्रचिकित्सा करणारी गाडी निघाली की अनेक रुग्ण तपासणीसाठी येतात.विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने आठवड्यातून चार दिवस वैद्यकीय शिबिरांचे आय़ोजन केले जाते. ग्लुकोमिया, डायेबिटक रेटिनोथेरपी, शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांमधील नेत्रविकार, मोतिबिंदू यांची चाचणी केली जाते.या नव्या अद्ययावत व्हॅनमध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, क्लिनर यांची टीम सज्ज असते. ही व्हॅन पूर्णपणे सुसज्ज वातानुकूलित आहे. यामुळे शिवाजीनगर आणि चिता कॅम्पमधील रुग्णांचा फायदा होतो. मधुमेह, मोतीबिंदू, काचबिंदू ,चष्म्याचा नंबर यासारख्या डोळ्यांच्या अनेक व्याधींचे निदान व उपचार व्हॅनमध्ये केले जातात. डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे वा योग्यवेळी वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे ज्यांना अंधत्व येऊ शकते वा डोळ्यांच्या संदर्भात गंभीर स्वरूपाची समस्या निर्माण होऊ शकते, त्यांना या वैद्यकीय सुविधेमुळे दिलासा मिळाला आहे.पहिल्या टप्प्यात निदानमहापालिकेने सुरू केलेला सर्व सोयीयुक्त असा हा एकमेव उपक्रम आहे. त्यात रुग्णांना त्यांच्या राहत्या भागांत जाऊन सेवा देण्याचा उद्देश आहे. ज्येष्ठ नागरिकांमधील मोतिबिंदू, काचबिंदू यांचे पहिल्या टप्प्यामध्येच निदान होऊन त्यांच्यावर वेळेवर उपचार व्हावेत. तसेच नेत्रदोषांमुळे कोणाच्याही आयुष्यात कायसस्वरूपी अडचणी येऊ नयेत, असा यामागील उद्देश असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधाकर मेढेकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले.उपक्रमांचे कौतुकफिरते नेत्ररुग्णालय हा नायर रुग्णालयाचा विशेष उपक्रम अविरत आणि नियमित रुग्णसेवेसाठी राबविला जातो. त्यासाठी नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. नयना पोतदार यांना अकॉइन मसिहा ऑफ एक्सलन्स इन कम्युनिटी आय हेल्थ सर्व्हिसेस इन मुंबई हा पुरस्कार नवीन मोबाइल व्हॅन आउटरीच कार्यक्रमासाठी समुदाय नेत्ररोगशास्त्र २०२३च्या आंतरराष्ट्रीय सभेमध्ये मिळाला. यावेळी नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, भूतानचे प्रतिनिधी उपस्थित होते.