ग्रामपंचायत निवडणुकांना आव्हान; ६ नोव्हेंबरला होणार सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 6, 2023

ग्रामपंचायत निवडणुकांना आव्हान; ६ नोव्हेंबरला होणार सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

https://ift.tt/stDayY6
नागपूर: राज्यातील तब्बल २,३६९ आणि जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. सरपंचपदासाठी थेट निवडणुका होणार असून त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणामुळे एकूण आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक होते आहे, असा दावा करत या निवडणूक कार्यक्रमाला आव्हान देण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल अखेर वाजला आहे. जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतीमध्ये या निवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाद्वारे ३ ऑक्टोबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दिवाळीपूर्वी या निवडणुकांचा बार उडणार आहे. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरीसुद्धा आगामी लोकसभेपूर्वी या निवडणुका होत असल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, गुणवंत काळे यांनी या निवडणुकांना आव्हान दिले आहे. या याचिकेवर आज, शुक्रवारी न्या. अतुल चांदूरकर आणि न्या. वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी होणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनासुद्धा याच कारणांमुळे आव्हान देण्यात आले होते. मात्र, त्यावेळी याचिका दाखल करण्यात बराच उशीर झाल्याने ती फेटाळण्यात आली होती, हे विशेष.