https://ift.tt/6MdZSJo
वृत्तसंस्था, कोलकाता: पश्चिम बंगाल आणि दुर्गापूजा यांचे अतूट नाते आहे. या उत्सवात प्रत्येक बंगाली रंगून जातो. उत्सवाचा हा रंग यंदा ‘युनेस्को’ने हेरिटेज म्हणून सन्मानित केलेल्या कोलकात्यातील ट्रामसेवेतही उतरला आहे. शहराची सर्वांत जुनी ओळख असलेली ट्राम दुर्गापूजेनिमित्त रंगविण्यात आली आहे. यातून बंगाली संस्कृती आणि विशेषत: दुर्गापूजेचे दर्शन घडविण्यात आले आहे.
ट्रामचे नवे रूप कसे?
दुर्गादेवीचे मृगनयनी डोळे, कुमारतुली, पांढऱ्या साड्या परिधान केलेल्या, ढाक वादन करणाऱ्या महिला, सिंदूर खेलात रंगलेल्या सौभाग्यवती, दुर्गामातेसमोर केले जाणारे धुनुची नृत्य, कोलकात्याची विशेष ओळख असलेली शंभर वर्षांपूर्वीची व्हिक्टोरिया मेमोरिअल इमारत, बंगाली वाघ अशी पश्चिम बंगालची प्रतीके या ट्रामवर साकारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, ही सर्व चित्रे हाताने चितारण्यात आली आहेत.- ट्रामचे केवळ बाह्यच नव्हे, तर अंतर्गत रूपडेही बदलण्यात आले आहे- बंगाली सणांचे महत्त्व सांगणाऱ्या आकर्षक रांगोळ्या खिडक्यांभोवती रेखाटल्या आहेत- ट्रामचे अंतर्गत छत सिंदूर खेलाच्या कुंकवाप्रमाणे भडक रंगाचे आहे- आतमध्ये एलईडी दिव्यांची रांग तेजाची उधळण करणारी आहे- बोगीतील अंतर्गत घटक आणि क्यूआर कोड प्रवाशांना उत्सवामागील कथांची माहिती देणार- त्यामुळे चालू वर्षी दीडशे वर्षे पूर्ण करणारी ट्राम जणू नववधूप्रमाणे नटल्यासारखी भासत आहे
विशेष सेवेचा उद्यापासून आनंद
विशेष ट्राम सेवेमध्ये बसण्याची संधी प्रवाशांना सोमवार, दि. १६ ऑक्टोबरपासून मिळणार आहे. बालीगंज आणि टॉलीगंज दरम्यान दि. ३१ डिसेंबरपर्यंत ही ट्राम धावणार आहे. हे अंतर सुमारे साडेपाच किलोमीटर आहे. दोन बोग्यांच्या या ट्रामद्वारे दुर्गापूजेच्या सान्निध्यातील आलिशान प्रवासाची अनुभूती मिळणार आहे.अशा नवनवीन संकल्पना आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही वातानुकूलित लायब्ररी ट्राम, आर्ट गॅलरी ट्राम, ज्यूट ट्राम अशी रूपे साकारण्यात आली आहेत. यंदाची दुर्गापूजा दर्शविणारी ही सहावी ट्राम आहे, असे पश्चिम बंगाल परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजनवीरसिंह कपूर यांनी सांगितले. Read Latest And