पाकिस्तानविरुद्धच्या लढतीआधी रोहितचा मोठा निर्णय; बाबरचे टेन्शन वाढले, टीम इंडिया वापरणार ट्रम्प कार्ड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 10, 2023

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीआधी रोहितचा मोठा निर्णय; बाबरचे टेन्शन वाढले, टीम इंडिया वापरणार ट्रम्प कार्ड

https://ift.tt/YbisjeF
चेन्नई: सर्वाधिक पाच वेळा वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाचा भारताने पहिल्याच सामन्यात पराभव करून वर्ल्डकप २०२३ची धमाकेदार सुरुवात केली. स्पर्धेतील भारताची दुसरी लढत ११ ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या लढतीत भारताला विजय मिळवण्यास फार अडचण होणार नाही. जर सर्व काही ठिक झाले तर भारताचा विजय रथ तिसऱ्या लढतीसाठी अहमदाबाद येथे पोहोचेल आणि तेथे भारताची लढत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत टीम इंडिया वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धचे विजयी रेकॉर्ड कायम राखण्यास उत्सुक असेल. सलग आठव्या विजयासाठी टीम इंडियाचा कर्णधार असे अस्त्र वापरले ज्याची भीती खुद्द पाकिस्तानला देखील वाटते. कोण आहे रोहित शर्माचे ट्रम्प कार्ड?ऑस्ट्रेलियाच्या लढती आधी शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. आता बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार तो अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत खेळणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुभमन गिलच्या जागी ईशान किशनला संधी दिली होती. मात्र तो शून्यावर बाद झाला. तर चौथ्या क्रमांकावर आलेला श्रेयस अय्यर देखील शून्यावर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाने भारताची अवस्था ३ बाद २ अशी केली होती. ज्यात रोहित शर्माचा देखील समावेश होता. ईशान किशन हा राइट-लेफ्टचा चांगला पर्याय देत असल्याने तो एक्स फॅक्टर होऊ शकतो म्हणून संघ व्यस्थापन श्रेयस अय्यरच्या जागी ट्रम्प कार्ड वापरू शकते. इंडियन मिस्टर ३६० डिग्री नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या फलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणतो. त्याची टी-२० स्ट्राईल फलंदाजीने उत्तम फिनिशर म्हणून वापर केला जाऊ शकतो. त्यामुळेच अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत त्याला संधी देऊन पाकिस्तानविरुद्धच्या सूर्याच्या क्षमतेचा पूर्ण वापर केला जाईल. तसेही संघात विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे एका प्रकारचे फलंदाज आहेत. त्यांची स्टाईल सारखीच आहे. मोकळेपणाने शॉट खेळण्यासाठी त्यांना काही काळ खेळपट्टीवर थांबावे लागते. हार्दिक पंड्या देखील आधी सारखी आक्रमक फलंदाजी करत नाही. संघ व्यवस्थापनाने कदाचित त्याला नवी भूमिका दिली असेल. अशात सूर्यकुमार हा उत्तम पर्याय आहे. जो वेगाने धावा करू शकतो आणि प्रतिस्पर्धी संघाला धक्के देऊ शकतो. सूर्यकुमार मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात चेंडू मारू शकतो. तो मैदानावर असे पर्यंत गोलंदाजाला चेंडू कुठे टाकू असा प्रश्न पडतो. एक चेंडू मारण्यासाठी त्याच्याकडे सहा पर्याय असतात. त्यामुळे टेन्शनमध्ये गोलंदाज असतो. पाकिस्तानच्या विरुद्ध त्याने अद्याप एकही वनडे मॅच खेळली नाही. अशाच शाहीन शाह आफ्रिदी, हारिस राउफ अशा गोलंदाजांसाठी रोहित सरप्राइस असू शकते. सूर्याने पाकिस्तानविरुद्धच्या ४ टी-२० सामन्यात ५७ धावा केल्या आहेत.