लग्नाचा आनंदोत्सव दु:खात बदलला, मांडवाला आग अन् १०० जण होरपळले, अंगावर काटा आणणारा VIDEO - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 4, 2023

लग्नाचा आनंदोत्सव दु:खात बदलला, मांडवाला आग अन् १०० जण होरपळले, अंगावर काटा आणणारा VIDEO

https://ift.tt/8s1r7Kh
इराक: इराकमध्ये नुकतीच एक भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. येथील एका लग्न समारंभात आग लागून १०० हून अधिक लोकांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. तर आणखी १५० जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे लग्नाचा आनंदोत्सव सुरु असलेल्या फंक्शन हॉलचे रुपांतर स्मशानभूमीत झाले. गेल्या आठवड्यात इराकमधील मोसुलच्या बाहेरील अल-हमदानिया येथील एका फंक्शन हॉलमध्ये हा भीषण अपघात घडला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आग लागल्यानंतर काही सेकंदातच ही आग वेगाने पसरल्याचं दिसून आलं. व्हिडिओमध्ये नवविवाहित जोडपं लग्न झाल्यानंतर अतिशय रोमँटिक अंदाजात नाचताना दिसत आहेत. त्याचवेळी तेथे इनडोअर फटाके जाळले जात आहेत. यानंतर काही वेळातच मंचावरून अचानक फटाके उडू लागले. फटाक्यांमुळे हॉलच्या छताला केलेलं डेकोरेशन जळू लागलं आणि आग मोठ्या वेगाने पसरु लागली. हे पाहून पाहुणे जीव वाचवण्यासाठी बाहेर पळू लागले. मात्र, काही वेळातच आग संपूर्ण फंक्शन हॉलमध्ये पसरली.घटनेनंतरच्या फुटेजमध्ये इमारतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते. इराकी न्यूज एजन्सीनुसार, नागरी संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितले की, लग्नमंडपाच्या बाहेरील भाग अत्यंत ज्वलनशील पदार्थांनी सजवण्यात आला होता, जो देशात बेकायदेशीर होता. आगीमुळे सभागृहाचा काही भाग लगेचच कोसळला.