कीर्तिकरांनी लोकसभेला उमेदवारी नाकारल्यास पर्याय कोण? रामदास कदमांनी नाव जाहीर केलं, म्हणाले... - Times of Maharashtra

Sunday, November 5, 2023

demo-image

कीर्तिकरांनी लोकसभेला उमेदवारी नाकारल्यास पर्याय कोण? रामदास कदमांनी नाव जाहीर केलं, म्हणाले...

https://ift.tt/jEIQmTM
photo-104973322
रत्नागिरी : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हेच पुन्हा उभे राहतील. कदाचित या लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सिद्धेश कदम त्यांची काही चर्चा झाली असेल असे सांगत खासदार गजाभाऊ कीर्तिकर यांचे आता वय झाले आहे ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात कदाचित गजाभाऊ कीर्तिकर उभे राहिले नाहीत तर या ठिकाणी सिद्धेश कदम उमेदवारी मागतील, असं मोठे वक्तव्य शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली दौऱ्यावर असताना केलं आहे. मुंबई गोरेगाव येथे वास्तव्य असलेले विद्यमान खासदार गजाभाऊ कीर्तिकर हे येथून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गेल्यावेळी खासदार म्हणून निवडून आले होते. स्थानीय लोकाधिकार समिती पासून अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी शिवसेनेत काम केले आहे. एकेकाळचे बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांचा या सगळ्या परिसरात मोठा जनसंपर्क आहे. रामदास कदम व गजाभाऊ कीर्तिकर यांचेही जवळचे संबंध आहेत. कदम यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी गजाभाऊ कीर्तिकर खास मुंबई येथून खेड येथे दाखल झाले होते त्यावेळी त्यांनी रामदास कदम यांच्या कामाचही कौतुक केलं होतं. त्यानंतर काही दिवसातच शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर दाखल झाले. मात्र त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहेत. त्यामुळे आता कीर्तिकर यांनी वयोमानानुसार उमेदवारी नाकारल्यास रामदास कदम यांनी आपल्या आपले मोठे चिरंजीव सिद्धेश कदम यांच्या लोकसभा उमेदवारीचे सुतोवाच केले आहे.सिद्धेश कदम या गजानन कीर्तिकर विद्यमान खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत हे आपणदेखील माध्यमांमधून ऐकतो आहे. गजानन कीर्तिकर हे जर का उभे राहिले नाहीत तर या लोकसभा मतदारसंघातून सिद्धेश कदम उमेदवारी मागतील आणि तो आपला हक्क आणि अधिकार आहे पण गजाभाऊ जर का इकडे उभे राहिले तर सिद्धेश कदम उभे राहणार नाहीत असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे गटाकडून अमोल किर्तिकर याच मतदारसंघातून उमेदवार असतील असेही आपण ऐकतो आहे.यामुळे बाप आणि बेटा यांच्यामध्येही या मतदारसंघात सामना होत असेल तर होऊन जाऊ दे असेही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.Read Latest And

Pages