कुंड स्नान करा, १२ रुपयात पापमुक्ती प्रमाणपत्र न्या, महादेव मंदिर व्यवस्थापनाची अजब 'ऑफर' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 3, 2023

कुंड स्नान करा, १२ रुपयात पापमुक्ती प्रमाणपत्र न्या, महादेव मंदिर व्यवस्थापनाची अजब 'ऑफर'

https://ift.tt/wgQ9HK0
वृत्तसंस्था, प्रतापगड: गंगा, यमुनेसारख्या पवित्र नद्यांमध्ये अथवा काशी, प्रयाग अशा तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे पापे धुतली जातात, अशी समजूत आहे. राजस्थानातील प्रतापगडधील हरिद्वार वगाड (जि. बांसवाडा) येथील गौतमेश्वर मात्र चक्क पापमुक्तीचे प्रमाणपत्र देते, तेही अवघ्या १२ रुपयांत. या मंदिरातील कुंडात स्नान केल्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते, असा मंदिर व्यवस्थापनाचा दावा आहे.गोतमेश्वर महादेव मंदिर राजस्थानची राजधानी जयपूरपासून सुमारे ४५० किलोमीटरवर दक्षिणेला आहे. हे ठिकाण मध्य प्रदेशातील रतलामपासून जवळ आहे. राज्य सरकारच्या देवस्थान विभागाच्या अखत्यारित हे मंदिर आहे.या मंदिरातील मंदाकिनी कुंडात स्नान केल्यानंतर पापमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात येते. अर्थात, असे प्रमाणपत्र मागणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे. गेल्या वर्षभरात जेमतेम २५० ते ३०० भाविकांनी अशी प्रमाणपत्रे घेतली आहेत. ही प्रथा कधी सुरू झाली, याचे तपशील समजले नाहीत. मात्र, एखाद्या व्यक्तीने कळत-नकळत प्राणीहत्या केली असल्यास किंवा त्याला जात बहिष्कृत करण्यात आल्यास त्याने मंदाकिनी कुंडात स्नान केल्यानंतर त्याची पापे धुतली जातात, असे सांगण्यात येते. अशा व्यक्तीने मागितल्यास त्याला पापमुक्तीचे प्रमाणपत्र दिले जाते. संबंधित व्यक्ती पापमुक्त झाली असून, त्याला समाजात परत घेण्यात यावे, पापमोचक मंदाकिनी कुंडात स्नान करणाऱ्यास १२ रुपये भरून पापमुक्तीचे प्रमाणपत्र दिले जाते. मंदिराजवळील कार्यालयातील अमीन (तलाठी किंवा महसूल खात्याचा कर्मचारी) याच्या सहीने हे प्रमाणपत्र दिले जाते. सर्व प्रमाणपत्रांच्या नोंदी ठेवल्या जातात. - उदय लाल मीणा, सरपंच, हरिद्वार वगाडRead And