तरुण मतदानाचा हक्क बजावण्यास गेला; मतदान करून बाहेर आला, तेवढ्यातच नियतीनं डाव साधला, अन्... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 7, 2023

तरुण मतदानाचा हक्क बजावण्यास गेला; मतदान करून बाहेर आला, तेवढ्यातच नियतीनं डाव साधला, अन्...

https://ift.tt/wnejlPt
अहमदनगर: करंजी येथे ग्रामपंचायत निवडणूक सुरू असताना आज रविवार मतदानाच्या दिवशीच सकाळी दहा वाजेच्या दरम्यान सुनिल कांतीलाल गांधी (४०) हा तरुण मतदान करून आला. त्यानंतर मतदान कक्षाच्या बाहेर आल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तो मृत झाला असल्याचे डॉक्टरने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील गांधी हे मतिमंद स्वभावाचे होते. ते काही दिवसांपासून आजारी होते. पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात मतदान करून केंद्राबाहेर आलेले मतदार सुनील गांधी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. गांधी बरेच दिवस आजारी होते, मात्र कर्तव्य म्हणून मत द्यायला गेले होते. मात्र मतदानादरम्यान त्यांना मृत्यू आल्याने उपस्थित ग्रामस्थ, मतदारांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान जिल्ह्यातील सरपंचपदासाठी ६१० तर सदस्यपदासाठी ३ हजार ९९५ उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले. ७३२ मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तात मतदान पार पडले. नगर जिल्ह्यातील १७८ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले. बहुतांश ठिकाणी ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. पाथर्डी तालुक्यातील करंजी, चिचोंडी, जवखेडे खालसा, दगडवाडी, धारवाडी, डोंगरवाडी, गितेवाडी, डमाळवाडी, रेणुकावाडी या पश्चिम भागातील ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. एकंदरित करंजीमध्ये सकाळपासूनच मतदारांचा मतदान करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. मतदान प्रक्रिया साडेपाच वाजता शांततेत पार पडली. एकूण ८४ टक्के मतदान या निवडणुकीसाठी झाले. या निवडणुकीमध्ये नशीम रफिक शेख व विजया आबासाहेब अकोलकर दोघींमध्ये सरपंच पदासाठी काटे की टक्कर झाली असून या दोघींसह त्यांच्या इतर सदस्य पदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. दोन्ही गटाकडून विजयाची खात्री दिली जात आहे.