
मुंबई: अत्यंत चुरशीच्या लढतीत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या वर्ल्डकप २०२३च्या सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडवर शानदार विजय साकारला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचे टार्गेट दिले होते. उत्तरादाखल त्यांचा डाव ३२७ धावात संपुष्टात आला आणि भारताने ही मॅच ७० धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडने शानदार सुरूवात केली होती. मोहम्मद शमीने न्यूझीलंडच्या डावाला पहिला सुरुंग लावला. त्यानंतर डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी १८१ धावांची खेळी करून भारताची काळजी वाढवली होती. पण शमी पुन्हा एकदा संघाच्या मदतीला आला. त्याने केन आणि मिशेल ही जोडी फोडली. ३३व्या ओव्हरमध्ये शमीने केन आणि लेथम यांना बाद केले, ज्याने भारताने मॅचमध्ये कमबॅक केले. या दोन विकेटसह शमीने वर्ल्डकपमध्ये ५० विकेटचा टप्पा पार केला. वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे. इतक नाही तर वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगाने ५० विकेट घेण्याचा विक्रम शमीने स्वत:च्या नावावर केला. शमीने १७ डावात ही कामगिरी केली. याआधी हा विक्रम मिशेल स्टार्कच्या नावावर होता त्याने २९ डावात ही कामगिरी केली होती. फक्त डावांचा विचार करता नाही तर चेंडूचा विचार करता शमी ५० विकेट घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने ७९५ चेंडूत ५० विकेट घेतल्या. याआधी हा विक्रम ९४१ चेंडू ५० विकेट घेण्याची कामगिरी केली होती. मोहम्मद शमीने एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम या सामन्यात केला. त्याने जहीर खानचा २१ विकेटचा विक्रम मागे टाकला. शमीने न्यूझीलंडविरुद्ध ९.५ षटकात ५७ धावा देत ७ विकेट घेतल्या. त्याच्या नावावर २३ विकेट झाल्या आहेत. या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. विशेष म्हणजे शमीला पहिल्या ४ मॅचमध्ये त्याला अंतिम ११ मध्ये संधी दिली नव्हती. या वर्ल्डकपमध्ये त्याची पहिली मॅच न्यूझीलंडविरुद्ध धरमशाला येथे होती. त्या मॅचमध्ये त्याने ५ विकेट घेतल्या होत्या. वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ५ विकेट घेण्याचा विक्रम शमीच्या नावावर झाला आहे. त्याने या वर्ल्डकपमध्ये ४ वेळा अशी कामगिरी केली आहे. याआधी कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती. तर एका वर्ल्डकपमध्ये ३ वेळा ५ विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.एकाच संघाविरुद्ध वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक वेळा ५ विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमी स्टार्कसह संयुक्तपणे अव्वल स्थानी पोहोचला आहे. स्टार्कने देखील न्यूझीलंडविरुद्ध दोन वेळा अशी कामगिरी केली आहे. तर शमीने देखील न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली. भारताकडून एका वनडेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम शमीच्या नावावर झाला आहे. त्याने स्टुअर्ट बिन्नीचा २०१४ साली बांगलादेशविरुद्ध ४ धावात ६ विकेट हा विक्रम मागे टाकला. Read Latest And