त्र्यंबकेश्वर : नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील आत्महत्याग्रहस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांच्या आधारतीर्थ आश्रमात वास्तव्यास असलेल्या राधिका वाल्मीक शेटे (वय १३) या मुलीचा अकस्मात मृत्यू झाला. काय घडलं?त्र्यंबक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि. २७) सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास राधिका आश्रमात चक्कर येऊन पडली. तिला तेथील व्यवस्थापक अशोक पाटील व एक महिला कर्मचारी यांनी त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. लोखंडे यांनी तपासले असता ती मृत झाल्याचे स्पष्ट झाले. तिचा मृतदेह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. याबबात रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी ८.५० वाजता आधारतीर्थ आश्रमाचे कर्मचारी राधिकाला घेऊन आले, तेव्हा ती मयत होती. तपासणीत तिच्या गळ्याला टॉन्सिलच्या जखमा आणि पायावर खरचटलेले होते. दरम्यान, राधिका लहान असताना एका महाजाराने आश्रमात दाखल केले होते. तिला नातेवाइक नसल्याचे समजते. याबाबत त्र्यंबक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक बीपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
https://ift.tt/7C43YEN