युवक मित्रांसह हॉटेलमध्ये बसला होता, तेवढ्यातच दबा धरुन बसलेल्या टोळक्याचा हल्ला अन् होत्याचं नव्हतं झालं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 17, 2024

युवक मित्रांसह हॉटेलमध्ये बसला होता, तेवढ्यातच दबा धरुन बसलेल्या टोळक्याचा हल्ला अन् होत्याचं नव्हतं झालं

https://ift.tt/zQekmZ9
इंदापूर: एका युवकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात घडली आहे. अचानक झालेल्या या गोळीबाराने इंदापूर शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नसून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या गोळीबारात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अविनाश धनवे असल्याचे सांगितले जात आहे. धनवे हा पुण्याकडील आळंदी परिसरातील राहणार असल्याचे समजते. ही गोळीबाराची घटना इंदापूरच्या बायपासवर असणाऱ्या जगदंबा हॉटेलमध्ये घडली. या घटनेविषयी अधिकृत माहिती समजू शकलेले नाही. मात्र दोन गटातील पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी, असे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबला होता. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याच्या डोक्यात गोळी लागली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्याच्या शरीरावर इतर ठिकाणी जखमा झाल्याचे प्रथमदर्शनींनी सांगितले आहे.