उन्हाळ्यातही नागपुरात पाऊस अन् गारपीट; पुढील २ दिवस ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 17, 2024

उन्हाळ्यातही नागपुरात पाऊस अन् गारपीट; पुढील २ दिवस ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?

https://ift.tt/ZVS7wFK
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस आणि गारपिटीने शनिवारी शहराला झोडपून काढले. शहराच्या काही भागांतील १६ झाडे उन्मळून पडली. काही लोकांच्या घरात पाणी घुसल्याने अडचणींचा सामना करावा लागला. नागपुरात ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून पुढील दोन दिवस गारपीट आणि जोराचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गरज नसताना शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.-शनिवारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागपूरकरांची तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यारस्त्यांवर पालापाचोळा साचला होता.-काही भागांत नुकसान झाले असले तरी कुठेही जीवितहानी झाली नसल्याचे मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे यांनी सांगितले.-अनेक भागांत वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रान्समिशन लाइनवर झाडे पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी कामाला लागले होते.-हवामान खात्याने १८ आणि १९ मार्च या दोन दिवशी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. -पूर्व नागपुरात तीनपेक्षा जास्त ठिकाणी घरांवर झाडे पडल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी झाडाखाली असलेल्या वाहनांचे नुकसान झाले.-रिझर्व्ह बँकेचे प्रवेशद्वार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान देवगिरी, सिव्हिल लाइन्समधील हैदराबाद हाउस, गजानननगर, कलेक्टर कॉलनी, गोधनी पेट्रोल पंपासमोरील शिवमंदिर, राजभवन सदर गेट, सुगतनगर, अशोकनगर आदी भागांत झाडे उन्मळून पडली.-चांभारनाला, कडबी चौक, ख्रिश्चन कॉलनी, मेकोसाबाग, झिंगाबाई टाकळी, विनोबा भावेनगर, गांधी चौक, शिवाजी चौक गांधी गेटजवळ, महाल, गणेश टेकडी मार्ग आदी भागांत फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.