छत्रपती संभाजीनगर: बहिणीला प्रेमविवाहाला मदत केल्याचा राग धरून वडिलांसोबत घरी जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला पाठीमागून जीपने धडक दिली. या धडकेनंतर जीप माघारी वळवून चार वेळेस तरुणाच्या डोक्यावर जीप घालून त्याची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यात सचिन भाकचंद वाघचौरे, रूपचंद लक्ष्मण वाघचौरे, विशाल रूपचंद वाघचौरे (तिघेही रा. धुपखेडा ता पैठण), राम विठ्ठल सोलट (रा. शेंदूरवादा, ता. गंगापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. या प्रकरणात वाळूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मार्चला दुपारी दीड वाजेच्या सुमारास वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेंदूरवादा-सावखेडा रस्त्यावर पवन शिवराम मोढे (रा. जुने ओझर) हा त्याच्या वडिलांसोबत बँकेतील कामे आटोपून घरी दुचाकीवर जात असताना पाठीमागून आलेल्या बोलेरोने जोरदार धडक दिली होती. बोलेरो समोर जाऊन वळून येऊन चार वेळेस पवनच्या डोक्यावर गाडी घालून त्याची हत्या करण्यात आली होती. पवन याच्या मामेभावाने प्रेमविवाह केला. या प्रेमविवाहाला पवनने मदत केल्याचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. ही कारवाई निरीक्षक राजेंद्र सहाणे, उपनिरीक्षक अजय शितोळे, सखाराम दिलवाले, रमेश राठोड यांच्या पथकाने केली.
https://ift.tt/jnBzfS3