Breaking News: संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; पुन्हा शिवसेनेत जाणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 4, 2024

Breaking News: संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; पुन्हा शिवसेनेत जाणार?

https://ift.tt/LAmEzvh
मुंबई: पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेसने यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मुंबई उत्तर पश्चिम हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाला दिल्याने संजय निरुपम नाराज होते. या जागेबाबत पुन्हा विचार करावा यासाठी त्यांनी पक्ष नेतृत्वाला ७ दिवसांचा कालावधी दिला होतो. कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडणार असल्याची घोषणा केली होती. आता पक्षानेच त्यांची हकालपट्टी केली आहे. काँग्रसमधून हकालपट्टी झाल्यानंतर आता संजय निरुपम काय भूमिका घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ते भाजप सोबत जाण्याची शक्यता फार कमी आहे. निरुपम यांना मुंबई उत्तर पश्चिममधून निवडणूक लढवायची होती. आता काँग्रेसने कारवाई केल्याने त्यांच्याकडे फार कमी पर्याय शिल्लक आहेत. निरुपम हे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर त्याचे घरवापसी झाल्यासारखे होईल.संजय निरुपम यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम या जागेवर दावा केला होता. मात्र या जागेवर चर्चा सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर संजय निरुपम यांनी मी खिचडी चोराचा प्रचार करणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर संजय निरुपम यांनी अशोक चव्हाण यांची भेटही घेतली होती. मात्र ही भेट वैयक्तिक असल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले होते. मात्र संजय निरुपम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता वाढत असल्याचे वक्तव्य केले. तसेच काँग्रेसबद्दलही वक्तव्य केल्याने काँग्रेसने संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली. काँग्रेसने स्टार प्रचाराकांच्या यादीतून काढून टाकल्यानंतर आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आपली भूमिका जाहीर करण्यासाठी संजय निरुपम यांनी उद्या (४ मार्च) पत्रकार परिषद बोलवली आहे. मात्र या पत्रकार परिषदेत संजय निरुपम हे भाजप की शिवसेना यापैकी कोणत्या पक्षात प्रवेश करणार? यासंदर्भात भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच संजय निरुपम यांना पक्षात घेऊन त्यांना अमोल किर्तीकर यांच्या विरोधात उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात संजय निरुपम हे शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.