टी-२० क्रिकेटमध्ये नकोशा असलेल्या यादीत विराट पोहोचला दुसऱ्या स्थानावर, धावांचे कौतुक करायचे की... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 10, 2024

टी-२० क्रिकेटमध्ये नकोशा असलेल्या यादीत विराट पोहोचला दुसऱ्या स्थानावर, धावांचे कौतुक करायचे की...

https://ift.tt/S1jPKhx
: पंजाब किंग्ज आणि आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केल्याचे पहायला मिळाले. कोहलीने आपल्या झंझावाती फलंदाजीने आपल्या स्ट्राईक रेटवर उपस्थित केलेले प्रश्न पुन्हा एकदा खोडून काढले. मात्र कोहलीचे या मोसमातील दुसरे शतक ८ धावांनी हुकले. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली तेही विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून भारतीय संघासाठी चांगले लक्षण आहे. मात्र, शतक हुकल्याने विराट कोहली थोडा निराश झाला होता. त्यानंतर डगआऊटवर जाताना त्याने बॅटही फेकल्याचे पहायला मिळाले. विराट कोहलीने धर्मशाला येथे पंजाब किंग्जविरुद्ध ९२ धावांची अप्रतिम खेळी केली. त्याने अवघ्या ४७ चेंडूंत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९२ धावा केल्या. या डावात त्याचा स्ट्राईक रेट १९५.४७ होता. एवढेच नाही तर विराटने आता या मोसमात ६०० हून अधिक धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. तो ९२ धावांवर बाद झाल्याने त्याच्या चाहत्यांनाही दु:ख झाले. मात्र ९० धावांच्या पुढे आऊट होण्याची त्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही तो नर्वस नाईन्टीजचा शिकार झाला आहे. नर्वस नाईटीजचा शिकार होण्याची ही विराट कोहलीची पाचवी वेळ आहे.

नर्वस नाईन्टीजच्या यादीत कोहली तिसऱ्या स्थानी

आयपीएलमध्ये ९० ते १०० दरम्यान सर्वाधिक वेळा बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत डेविड वॉर्नरचे नाव अग्रस्थानी आहे. डेविड वॉर्नर आयपीएलमध्ये एकूण ६ वेळा नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला आहे. त्यानंतर दुसरे नाव शिखर धवनचे आहे. तो आतापर्यंत ५ वेळा ९० ते १०० दरम्यान आऊट झाला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी विराट कोहलीचे नाव आहे. तो आतापर्यंत ५ वेळा नर्व्हस नाईन्टीजचा शिकार झाला आहे. चौथ्या स्थानी के एल राहुल आहे. तोही ५ वेळा आऊट झाला आहे. तर पाचव्या स्थानी क्रिस गेलचे नाव आहे. तो आतापर्यंत ४ वेळा नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला आहे.