मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाडोत्री गर्दी, पैसे देऊन लोकांना आणलेलं; चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 9, 2024

मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाडोत्री गर्दी, पैसे देऊन लोकांना आणलेलं; चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

https://ift.tt/2rHANoI
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बजाजनगर येथे झालेल्या जाहीर सभेला भाडोत्री गर्दी होती. पैसे देऊन लोकांना आणण्यात आले होते असा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केला. पैसे देऊन लोकांना आणण्यात आल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत असे ते म्हणाले.बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकात खैरे म्हणाले, बजाजनगर येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन लोकं आणले होते, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा घेण्यापेक्षा तुमच्यात हिंमत होती तर पंतप्रधानांची सभा का नाही घेतली असा सवाल त्यांनी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचे नाव न घेता केला. देवेंद्र फडणवीस यांची सभादेखील त्यांना घेता आली नाही असे ते म्हणाले. संदीपान भुमरे आपल्यावर रोज आरोप करीत आहेत, त्यांच्या आरोपांना आत्ता नाही , तर चार जूनच्या नंतर उत्तर देऊ असे खैरे म्हणाले.