कोण आहे अरुण रेड्डी? अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणी झाली अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 4, 2024

कोण आहे अरुण रेड्डी? अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणी झाली अटक

https://ift.tt/W2cYMNO
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी काँग्रेस सदस्य यांना अटक केली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अरुण रेड्डी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर 'स्पिरिट ऑफ काँग्रेस' नावाचं अकाऊंट सांभाळतात. अरुण रेड्डी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून शेअर केल्याचा आरोप आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, की व्हिडिओमधील शाह यांचे विधान धर्माच्या आधारावर मुस्लिमांसाठी कोटा संपवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल आहे, तर प्रसारित केलेला फेक व्हिडिओ पाहता, शाह सर्व प्रकारचं आरक्षण संपवण्याचा सल्ला देत असल्याचं सांगितलं जातं असल्याचं दिसतंय.

कोण आहेत अरुण रेड्डी?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फेक व्हिडिओप्रकरणी अरुण रेड्डी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर अरुण रेड्डी यांनी स्वत:ला काँग्रेसचे समर्थक असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या एक्स अकाऊंटच्या कव्हर फोटोवर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा फोटो आहे. तर अरुण रेड्डी त्यांच्या प्रोफाइल फोटोमध्ये भारत जोडो न्याय यात्रेचं प्रमोशन करताना दिसत आहेत. अरुण रेड्डी यांनी सोशल मीडियावर स्वतःला AICC चे नेशनल कोऑर्डिनेटर असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणी हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी शुक्रवारी पेंड्याला वामशी कृष्णा, मन्ने सतीश, पेट्टम नवीन, अस्मा तस्लीम आणि कोया गीता यांना अटक केली होती. या सर्वांना हैदराबादच्या न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यांना दोन जामीनदारांसह १० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जमा करण्यास सांगण्यात आलं असून न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत दर सोमवार आणि शुक्रवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.