https://ift.tt/1jp3FJO
मुंबई : मागील काही दिवसांपासून आणि त्याची पत्नी यांच्या घटस्फोटच्या चर्चेला वेग आला आहे. पण आता या प्रकरणास नवीन वळण आले आहे. सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशाने सोशल मीडियावर एक अजब पोस्ट शेयर केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
नताशाने आता नेमकं केलं तरी काय...
नताशाने हार्दिकसोबत तिचे जुने फोटो पुन्हा इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. नताशाने तिचे हार्दिकसोबत लग्नाचे फोटो आणि इतर हार्दिकसोबत असलेले फोटो जे आधी गायब केले होते ते पुन्हा तिच्या फीडवर आता दिसू लागले आहेत. यावरुन असे लक्षात आले की, नताशाने हे फोटो हटवले नसून लपवले असतील किंवा संग्रहित करुन ठेवले असतील आणि नंतर ते सेटींगमध्ये जाऊन पुनर्संचयित केले.
मुद्दाम घटस्फोटची अफवा पसरवली?
नताशाच्या या कृतीमुळे आता हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोविक यांचे नाते सुधारले कि, ते कधी बिघडलेच नव्हते असे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. हा सगळा पब्लिसिटी स्टंट होता का? आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याचा खराब फॉर्म आणि त्या आधी स्टेडियममध्ये त्याला चिडवले जाऊ लागले तसेच समालोचकांनी त्याच्यावर केलेल्या टिप्पणी यांपासून लक्ष हटवण्यासाठी हे सगळे नियोजन केले होते का. रोहित शर्माला अचानक मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरुन हटवले आणि गुजरात टायटंस संघातून हार्दिकला लिलावात विकत घेत त्याला कर्णधारपद दिल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का लागला. यानंतर सोशल मीडियासोबतच मैदानावर रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचे चाहत्यांनी हार्दिकला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
घटस्फोटची अफवा कशी पसरली
मध्यंतरी, Reddit वर एका वापरकर्त्याने विचारले होते की, नताशा आणि हार्दिक वेगळे झाले आहेत का? या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले, ज्यात सांगितले होते की, नताशाने इंस्टाग्रामवरुन हार्दिकचे आडनाव तिच्या नावातून हटवले होते. तसेच तिने त्याच्यासोबत असलेले जुने फोटो हटवले होते. याचसोबत ते दोघे एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत नाहीत. त्या वापरकर्त्याने पोस्टमधून यंदाच्या हंगामात आयपीएल सामन्यात नताशाच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले. नताशाचा वाढदिवस ४ मार्चला होता आणि या दिवशी हार्दिकने तिचा एकही फोटो पोस्ट केला नाही. नताशाने हार्दिकसोबत असलेले सर्व फोटो हटवले होते आणि फक्त अगस्त्यसोबतचे फोटो तिने तसेच ठेवले होते.हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये नेमकं सध्याच्या घडीला सुरु तरी काय आहे, हा प्रश्न आता सामान्य चाहत्यांना पडला आहे. कारण हे दोघे नेमकं काय करत आहेत, तेच चाहत्यांना कळेनासे झाले आहे.