आजचे राशीभविष्य 21 August 2025 : प्रमोशन मिळणार की नाही… आज काय सांगते तुमची रास? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 21, 2025

आजचे राशीभविष्य 21 August 2025 : प्रमोशन मिळणार की नाही… आज काय सांगते तुमची रास?

आजचे राशीभविष्य 21 August 2025 : प्रमोशन मिळणार की नाही… आज काय सांगते तुमची रास?

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 21 August 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मानसिक शांतता घेऊन येईल. तणावापासून मुक्ती मिळेल. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल होतील. तुमच्या पैशांची स्थिती सुधारेल. मात्र अनावश्यक खर्च टाळा.  कारण त्याचा आर्थिक नियोजनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रगतीचे संकेत मिळतील. तुमचे वैवाहिक जीवन आनंददायी आणि स्थिर राहील.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

वृषभ राशीच्या व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे तुम्हाला नवीन मित्र मिळतील. तुमच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीची एंट्री होऊ शकते. ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. मात्र तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

मिथुन राशीच्या व्यक्तींचे आज आर्थिक बाबींवरून वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक वाद टाळा. तुमचा आत्मविश्वास वाढेल. अचानकपणे एखादी रोमँटिक भेट होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमचा दिवस सुखद होईल. तुमचा जोडीदारही आज तुमच्यासोबत जास्त रोमँटिक मूडमध्ये दिसेल.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

कर्क राशीच्या व्यक्तींचे आज त्यांच्या विनम्र स्वभावामुळे कौतुक होईल. तुमचा जोडीदार तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी काहीतरी खास प्रयत्न करू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ज्यामुळे काम करणे सोपे होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मुलांचे सहकार्य मिळेल. मित्रांसोबत तुम्ही उत्तम वेळ घालवू शकाल.

सिंह राशी (Leo Daily Horoscope) 

सिंह राशीच्या व्यक्तींचे मन आज थोडे अस्थिर राहू शकते. दिवसाची सुरुवात व्यायाम करून करा, जेणेकरून तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहाल. आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे, नाहीतर तुमचे बजेट बिघडू शकते. कोणताही प्रवास टाळणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. आज कोणीतरी तुमच्या जोडीदारामध्ये जास्त रस दाखवू शकतो, पण घाबरू नका. दिवस संपेपर्यंत तुम्हाला समजेल की सगळे काही ठीक आहे.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

कन्या राशीच्या व्यक्तींचा आज आत्मविश्वास चांगला राहील, पण पैशांच्या स्थितीवरून तुमच्या मनात काही चढ-उतार असू शकतात. शैक्षणिक कामांमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून एखादे सरप्राईज गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा दिवस अविस्मरणीय बनेल.

तूळ राशी (Libra Daily Horoscope)

तूळ राशीच्या व्यक्तींची आज तब्येत चांगली राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादे महत्त्वाचे प्रोजेक्ट सोपवले जाऊ शकते. तुमच्या व्यापारिक स्थितीत सुधारणा होईल. यामुळे तुम्हाला अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी तुमच्याकडून काहीतरी खास अपेक्षा ठेवू शकतो, त्यामुळे त्यांना निराश करू नका.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या मनात आज विचारांचे चढ-उतार सुरू राहतील. तुमचे मन अभ्यासात जास्त रमले जाईल. शैक्षणिक कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमच्या बौद्धिक कामांमधून उत्पन्न वाढेल. नोकरीमध्ये बदल आणि प्रगतीची संधी मिळेल. उत्पन्न वाढेल, पण कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

धनु राशीच्या व्यक्तींच्या संवेदनशील स्वभावामुळे तुमच्या जवळच्या मित्राला त्रास होऊ शकतो. कुटुंबाचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. पण, आजचा दिवस रोमँटिक संबंधांसाठी चांगला नाही. त्यामुळे अशा चर्चा टाळा.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

मकर राशीच्या व्यक्तींनी आज छोट्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका. आज एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. हा वाद कोर्ट-कचेरीपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे वाद घालणे टाळा. खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत प्रवासाचा योग आहे.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांच्या स्वभावात बदल जाणवू शकतो, पण दिवसाच्या शेवटी सर्व काही सामान्य होईल. तुमची आर्थिक आणि व्यावसायिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

मीन राशीच्या व्यक्तींना आज राग आवरणे गरजेचे आहे. नोकरीमध्ये तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल. तुमची कमाई वाढेल. पण त्यासोबतच खर्चही जास्त असेल. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. वडिलांचे सहकार्य मिळेल. बौद्धिक कामांमध्ये तुम्हाला मान-सन्मान मिळेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)