
रशिया आणि युक्रेनच्या युद्धात सातत्याने भारतावर गंभीर आरोप केली जात आहेत. जगाला डोनाल्ड ट्रम्प हे दाखवत आहेत की, हे युद्ध रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला आहे. अमेरिकेच्या दादागिरी पुढे भारत झुकला नाही. आता अमेरिकेच्या विरोधात भारत, चीन, ब्राझील, जपान, रशिया असे मोठे देश एकत्र येताना दिसत आहेत. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तळफळाट उठला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर युक्रेन रशिया युद्ध थांबवण्याचे सोडून अधिक पेटल्याचे बघायला मिळत आहे.
रशियाने युक्रेनची राजधानी कीववर मोठा हल्ला केलाय. रशियाच्या हल्ल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी सीनेटर लिंडसे ग्राहम यांनी भारतावर मोठा आरोप केला आहे. भारतासोबतच त्यांनी चीन आणि ब्राझीलला देखील मोठी धमकी दिलीये. सीनेटरने म्हटले की, भारत, ब्राझील आणि चीन हे देश रशियाकडून तेल खरेदी करून त्यांना युद्धासाठीचा मशिन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.
त्यामुळे ते या लोकांच्या मरणासाठी जिम्मेदार ठरत आहेत. त्यांनी तिन्ही देशांना चेतावणी देत म्हटले की, तुम्हाला याची किंमत नक्कीच मोजावी लागेल. भारत, चीन, ब्राझील आणि अजून काही देश…तुम्ही दिलेल्या पैशातून मशिन खरेदी करून रशियाकडून लोकांची जीव घेतली जात आहेत. मुळात म्हणजे भारत हा पुतिनचे समर्थन करून चांगलीच मोठी किंमत मोजत आहे. बाकी देशांना देखील ती मोजावी लागणार आहे, हे स्पष्ट आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करून नफेखोरी करत असल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून सातत्याने भारतावर केला जात आहे. त्यामध्येच आता चीन आणि ब्राझीलबद्दलही बोलताना अमेरिका दिसत आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ हा लावण्यात आलाय. ब्राझील, चीन, भारत आणि रशिया अमेरिकेच्या दादागिरीच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. हेच नाही तर भारतातून अमेरिकेत निर्यात होणारे 70 टक्के वस्तू कमी झाल्या आहेत. अमेरिकेच्या टॅरिफनंतर नफा मिळणार नसल्याने अनेकांनी अमेरिकेत निर्यात करणे बंद केले आहे.