-
नखं खाणं ही एक सामान्य सवय आहे जी अनेकदा लहान मुलांमध्ये आणि मोठ्या व्यक्तींमध्येही दिसून येते. ही सवय आपल्या आरोग्यासाठी तर हानिकारक आहे. पण ज्योतिषशास्त्रानुसार, याचा आपल्या जीवनावर आणि ग्रहांवरही नकारात्मक परिणाम होतो.
-
नखं खाण्यामुळे शरीराला अनेक रोग होऊ शकतात. आपल्या नखांमध्ये आणि बोटांच्या त्वचेवर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, जंतू आणि धूळ साचलेली असते. नखं खाताना हे जंतू आपल्या पोटात जातात. त्यामुळे पोटाचे विकार, संसर्ग आणि इतर आजार होऊ शकतात.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, नखं खाण्याच्या सवयीमुळे व्यक्तीचे ग्रह बिघडतात आणि त्याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. नखं खाणाऱ्या व्यक्तीचा सूर्य ग्रह कमजोर होतो. सूर्य ग्रह आत्मविश्वासाचा आणि करिअरचा कारक मानला जातो.
-
जेव्हा सूर्य कमजोर होतो, तेव्हा व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता दिसून येते. त्यांना करिअरमध्ये अडचणी येतात. याशिवाय, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. वडिलांशी असलेले संबंधही बिघडतात.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, नखं खाणे हे शनि दोषाचे लक्षण असू शकते. याचा अर्थ असा की शनीची तुमच्यावर वाईट नजर आहे. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात.
-
नखं खाणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात पैशाची कमतरता जाणवू शकते. त्यांना अनेकदा आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. ही सवय त्वरित सोडून देणे आवश्यक आहे.
-
जर तुम्हाला नख खाण्याची सवय असेल तर ती नियमितपणे नखं कापा, जेणेकरून ती खाण्याची इच्छा होणार नाही. बाजारात एक खास प्रकारचा नेल पॉलिश मिळतो, जो कडू असतो. तो लावल्यास नखं खाण्याची इच्छा कमी होते.
-
अनेकदा ताण किंवा चिंता असताना लोक नखं खातात. त्यामुळे योगा, ध्यान किंवा इतर गोष्टी करा. जेव्हा नखं खाण्याची इच्छा होईल, तेव्हा हातांना व्यस्त ठेवण्यासाठी एखादे बॉल पेन किंवा इतर वस्तू पकडा.