WI vs PAK : विंडीज मालिका जिंकत पाकिस्तानचा हिशोब करणार? मंगळवारी अंतिम सामना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 12, 2025

WI vs PAK : विंडीज मालिका जिंकत पाकिस्तानचा हिशोब करणार? मंगळवारी अंतिम सामना

WI vs PAK : विंडीज मालिका जिंकत पाकिस्तानचा हिशोब करणार? मंगळवारी अंतिम सामना

पाकिस्तान क्रिकेट टीम वेस्ट इंडिज दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. पाकिस्तानने विंडीज विरुद्धची 3 सामन्यांची टी 20I मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. त्यानंतर आता उभयसंघातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम सामना जिंकून मालिका नावावर करण्याची संधी आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा एकदिवसीय सामना केव्हा?

विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा एकदिवसीय मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे.

विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा एकदिवसीय सामना कुठे?

विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा एकदिवसीय सामना ब्रायन लारा स्टेडियम, तारौबा, त्रिनिदाद येथे आयोजित करण्यात आला आहे.

विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा एकदिवसीय सामना भारताता टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.

विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे पाहता येईल.

सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी

उभयसंघात होणारा तिसरा सामना हा फक्त सामना नाही तर मालिका आहे. सामना जिंकून दोन्ही संघांना मालिका उंचावण्याची संधी आहे. पाकिस्तानचा टी 20I नंतर वनडेतही यजमान विंडीजला लोळवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर विंडीज पाहुण्या पाकिस्तानला वनडे सीरिज जिंकण्यापासून रोखण्यासाठी सज्ज आहे. शाई होप विंडीजचं नेतृत्व करणार आहे. तर मोहम्मद रिझवानकडे पाकिस्तानच्या कॅप्टन्सीची जबाबदारी आहे. त्यामुळे आता पाकिस्तान तिसरा आणि अंतिम सामना जिंकत सलग दुसरी मालिका जिंकणार की विंडीज पाहुण्यांचा हिशोब बरोबर करणार? हे तिसऱ्या सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.