-
आशिया कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात 28 सप्टेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात या स्पर्धेत तिसऱ्यांदा सामना होणार आहे. (फोटो- ACC)
-
भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा पराभूत केलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण आतापर्यंत आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली आहे ते जाणून घ्या. (फोटो- ACC)
-
भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे. संघाने आठ वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023) वनडे स्वरूपात सात वेळा आणि टी20 स्वरूपात एकदा विजेतेपद जिंकले आहे. (फोटो- ACC)
-
पाकिस्तानने आशिया कपच्या इतिहासात फक्त दोनदाच ट्रॉफी जिंकली आहे. 2000 च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 39 धावांनी हरवून विजेतेपद पटकावले. त्यानंतर मिसबाह-उल-हकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 2012 चा आशिया कप जिंकला. (फोटो- ACC)
-
आशिया कपची पहिलं पर्व 1984 मध्ये खेळवण्यात आलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 16 पर्व पार पडली. आता 17 वं पर्व सुरु आहे. पण आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं. (फोटो- ACC)