
आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम 2 संघ ठरले आहेत. टीम इंडियाने सुपर 4 मधील सलग 2 सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यानंतर सुपर 4 फेरीतील पाचव्या सामन्यात 25 सप्टेंबरला पाकिस्तानने बांगलादेश विरुद्ध 135 धावांचा यशस्वी बचाव केला. पाकिस्तानने बांगलादेशवर 11 धावांनी मात केली. यासह पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक दिली. आता उभयसंघात 28 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. त्याआधी सुपर 4 फेरीतील सहावा आणि शेवटचा सामना हा शुक्रवारी 26 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.