
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 26 व्या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहचले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना औपचारिकता असणार आहे. दोन्ही संघाचा हा या स्पर्धेतील सातवा सामना असणार आहे. लॉरा वोल्वार्ड्ट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर ताहिला मॅकग्राथ ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येईल? हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना केव्हा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना शनिवारी 25 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना कुठे?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वूमन्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिका कांगारुंना रोखणार?
गतविजेता ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 4 ऑक्टोबरचा श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे टॉसशिवायच रद्द करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आतापर्यंत न्यूझीलंड, पाकिस्तान, टीम इंडिया, बांगलादेश आणि इंग्लंडला पराभूत केलं आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन त्यांचा विजयरथ रोखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
नंबर 1 ची लढाई
तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नंबर 1 ची चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत. मात्र नेट रनरेट चांगला असल्याने ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे आता शनिवारी कोणता संघ विजयी होत पहिलं स्थान काबिज करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.