
फलटण येथील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेल्या संपदा मुंडे यांनी एक नोट हातावर लिहून आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने याने तब्बल चार वेळा संपदा मुंडे यांच्यावर बलात्कार केला. पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याने शारिरीक आणि मानसिक त्रास दिल्याचे तळहातावरील नोटमध्ये संपदा मुंडे यांनी स्पष्टपणे म्हटले. हेच नाही तर एका खासदारावरही गंभीर आरोप झाला. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणात एसआयटीची स्थापना करावी, अशी मागणी केली जातंय. मात्र, तशा हालचाली बघायला मिळत नाहीत. बीड जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी संपदा मुंडे हिच्या आई-वडिलांची भेट घेतली. आता ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांना मोठा प्रश्न विचारलाय.
लक्ष्मण हाके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मुख्यमंत्री महोदय, सप्रेम नमस्कार.. डॉ संपदाला न्याय भेटेल का हो ? असा थेट प्रश्न सुरूवातीलाच विचारला. पुढे लक्ष्मण हाके यांनी लिहिले की, महोदय आपण महाराष्ट्रात रहात असल्याची चीड यायला लागलीय. आपली मुलगी सुरक्षित आहे का?, सुरक्षित राहिल का आणि वसतिगृहात तिला ठेवणे कितपत योग्य या सारख्या असंख्य प्रश्नांनी लेकीचा बाप चिंताग्रस्त आहे. डॉक्टर संपदा तर गेली, तिने आत्महत्त्या केली की तिचा नराधमांनी गळा घोटला याचे उत्तर मिळायला अवधी आहे.
पुढे लक्ष्मण हाके लिहितात की, ज्या फलटणमधील पोलीस डिपार्टमेंट आणि राजकारणी लोकांवर संशयाची सुई आहे त्याच फलटणमध्ये तुम्ही आलात आणि त्याच फलटणमध्ये पुढाऱ्यांना क्लीनचीट दिलीत. महाराष्ट्रातील माता भगिनीच्या मनात प्रचंड संताप निर्माण झालाय, कोण तो खासदार त्याने ऊसतोड मजूराना गुलाम समजून स्वराज चालवला आहे, दहा लाख ऊसतोड मजूरांना या महाराष्ट्रात माणूस म्हणून कायदा नाही असा माझा गृह विभागावर आरोप आहे.
कारखाण्याची धुराडी पेटण्याच्या अगोदर ऊसतोड मुकादम -मजूर यांचे अपहरण मारहाण त्याचे सातबारे यांचं काय काय होतं हा संशोधनाचा विषय आहे. आज डॉ संपदा चा बळी गेला, सध्याच्या घडीला एसआयटी स्थापना होणं गरजेचं आहे. सुसाईड नोट म्हणून हातावर लिहलेलं हस्तक्षर त्यांचं आहे का? यावर प्रश्न चिन्ह आहे. पीएसआय गोपाळ बदने यांच्याविरोधात फलटणच्या डीएसपींकडे लेखी तक्रार करुनही कारवाई झाली नाही आणि ती कारवाई झाली असती तर डॉ. संपदा मुंडे आज आपल्यात असत्या.
संपदा मुंडेंवर आत्महत्येची वेळ आली ती अधिकाऱ्यांमुळे. या परिस्थितीला जन्म देण्यास कारणीभूत जी नेते मंडळी आहेत ते मोकाटच फिरणार आहेत का? प्रत्येक वेळी तुम्ही राजकारण करणार आहात का? अश्या लोकांना पाठीशी घालणार आहात का याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागणार आहे, असे हाकेंनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, ते मिळणार नसेल तर महाराष्ट्रात डॉ संपदाला न्याय भेटेपर्यंत जनआंदोलन उभं करावे लागेल.
डॉ संपदा प्रकरण संवेदनशील असताना आपलं राजकारण महाराष्ट्राला आवडलं नाही, मुख्यमंत्री महोदय तुम्ही सुज्ञ आहात प्रत्येक गोष्टीत राजकारण आपण का कराव, आरोपीच्या म्हुसक्या आवळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेल्याची भावना जनतेत आहे, असेही लक्ष्मण हाकेंनी म्हटले. एकप्रकारे या