
तीन वर्षांनंतर जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी Amazon ने पुन्हा एकदा कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. तर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे याबद्दल औपचारिकपणे माहिती दिली आहे. मात्र आता अमेझॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी वरून काढण्याची माहिती मिळताच खळबळ उडाली आहे. अशातच कंपनीने 30,000 हून अधिक कॉर्पोरेट नोकऱ्या कमी करण्याची तयारी करत आहे. मंगळवारपासून ही कपात सुरू केली आहे आणि कोविड-19 च्या माहामारीनंतर कंपनीने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कपात लागू केली आहे.
यापूर्वी 2022 मध्ये Amazon ने अंदाजे 27,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. ज्यात डिव्हाइस, कम्युनिकेशंस आणि पॉडकास्टिंग या विभागाचा समावेश होता. मात्र यावेळी, एचआर, डिव्हाइसेस आणि सेवा आणि अमेझॉन वेब सेवा यासारख्या विभागांमध्येही ही कपात केली जाणार आहे. या कपातात अनुभवी कर्मचारी देखील कमी करणार आहेत. अशातच कंपनी एचआर विभागातील 15% कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे.
तर आता 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपेक्षा खूपच कमी आहे, कारण कंपनीच्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या अंदाजे 10% टक्केच कर्मचारी कपात करणार आहे. Amazon मध्ये अंदाजे 350,000 कॉर्पोरेट कर्मचारी आहेत.
मॅनेजर्सच्या जागाही होणार कमी
अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांच्या मते, कंपनीत ब्युरोक्रोसी लक्षणीयरीत्या वाढली असल्याने मॅनेजर्सची संख्या कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तक्रार लाइन सुरू करण्यात आली होती, ज्याला 1,500 हून अधिक प्रतिसाद मिळाले आहेत. अॅमेझॉनचे सीईओ यांनी जूनमध्येच म्हटले होते की एआयचा वापर वाढत आहे, ज्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाऊ शकते.
याचा अर्थ असा की अॅमेझॉन कंपनी आता त्यांच्या कॉर्पोरेट टीममध्ये एआयचा वापर वाढवणार आहे आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार आहे.
मिळालेल्या माहितनुसार 2025 मध्ये अंदाजे 216 कंपन्यांनी आतापर्यंत अंदाजे 98,000 लोकांना नोकरी वरून कपात केले आहे, जर आपण 2024 मध्ये झालेल्या कपातीची संख्या विचारात घेतली तर ही संख्या सुमारे 1,53,000 असल्याचे दिसून येते.