-
एकदिवसीय विश्वचषकातील पुरुष किंवा महिलांच्या नॉकआउटमध्ये 300 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंझार खेळी केली. दोन विकेट झटपट बाद झाल्यानंतर मैदानात उतरली होती. तिने जेमिमा रॉड्रिग्ससोबत 167 धावांची भागीदारी केली. ही भारताची विश्वचषकातील कोणत्याही बाद फेरीतील सर्वोच्च भागीदारी होती तसेच विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च भागीदारी होती. हरमनप्रीत कौरने 88 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार मारत 89 धावांची खेळी केली. (Photo- PTI)
-
कर्णधार हरमनप्रीत कौरने 65 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरचं दुसरं अर्धशतक आहे. पण हे अर्धशतक तिने गरजेच्या वेळी मारलं. बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने झुंजार खेळी केली. (Photo- PTI)
-
हरमनप्रीत कौरने तिसऱ्यांदा बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50हून अधिका धावांची खेळी केली आहे. अशी कामगिरी करणारी ती एकमेव फलंदाज ठरली आहे. (Photo- PTI)
-
हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकप 2022 च्या उपांत्य फेरीत शतक ठोकलं होतं. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध 2022 मध्ये अर्धशतकी खेळी केली होती. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा 50हून अधिक धावा केल्या आहेत. (Photo- PTI)
-
जेमिमा रॉड्रिग्सने विजयी खेळी केली. तिने 134 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 127 धावा केल्या. हरमनप्रीत कौर आणि जेमिमाची भागीदारी झाली नसती तर कदाचित चित्र वेगळं असतं. आता टीम इंडियाचा अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी सामना होणार आहे. (Photo- PTI)




