प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील कार अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौतमी पाटीलने चार दिवसांपूर्वीच पोलिसांकडून पाठवण्यात आलेले पत्र स्वीकारले आहे. हे पत्र तिला आपले म्हणणे मांडण्यासाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याबाबत होते. या घटनेमुळे कार अपघात प्रकरणातील चौकशीला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी हे पत्र दिल्यानंतर, गौतमी पाटीलने त्याची पोच घेतली होती. मात्र, मागील चार दिवसांपासून तिचा पोलिसांसोबत कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी तिला निवेदनासाठी बोलावले असले तरी, तिचा प्रतिसाद न मिळाल्याने पुढील कार्यवाही कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गौतमी पाटीलच्या नावे असलेल्या कार अपघात प्रकरणात ही एक महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे.