
भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी करुन क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. भारतीय महिला संघाने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे भारतीय संघाला आपल्या मोहिमेतील तिसऱ्या सामन्यातन विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आपल्या मोहिमेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे भारताकडे दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिका भारतीय संघाची विजयी घोडदौड रोखणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारताने स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात 30 सप्टेंबरला श्रीलंकेला पराभूत करत विजयी सलामी दिली. त्यानंतर 5 ऑक्टोबरला भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुव्वा उडवला. भारताने अशाप्रकारे सलग 2 सामने जिंकले. आता भारताच्या निशाण्यावर दक्षिण आफ्रिका आहे.