
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दाैऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई मेट्रो 3 च्या अंतिम टप्याचे लोकार्पण केल जाणार आहे. भूमिगत असलेली मेट्रो 3 आता पूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे असून त्याच्याच उद्धाटनासाठी नरेंद्र मोदी मुंबईत आहेत. आज शिवसेनेच्या चिन्हाबाबत कोर्टात अंतिम सुनावणी आहे. आम्हाला न्यायाची अपेक्षा असल्याचे संजय राऊतांनी म्हटले. कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली करण्यात आली. त्याबद्दल काल रात्री उशीरा आदेश काढण्यात आली. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नाशिकचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत. पंतप्रधान आज मुंबई दाैऱ्यावर असल्याने महत्वाच्या घडामोडी सुरू आहेत. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.